टी२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज मेलबर्नमध्ये रंगला होता. ज्या सामन्याकडे संपूर्ण देश टक लावून बघत होता त्या भारत-पाकिस्तान सामन्यात, भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला आहे. विराट कोहलीच्या तुफानी फलंदाजीने सामना खेचून आणला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८३ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे सध्या सगळीकडे विराटाचे कौतूक होत आहे.
आणखी वाचा : उर्वशी रौतेलाने घातली ऋषभ पंतची चेन?; व्हिडीओ पाहून नेटकरी गोंधळले
बॉलिवूडमधील अनेक कलाकार विराटच्या या कामगिरीचे कौतुक करताना दिसत आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन यानेही इन्स्टाग्रामवर त्याच्या ‘हाऊसफुल ३’ चित्रपटातील एक छोटी क्लिप शेअर करत विराटला शाबासकी दिली आहे. अभिषेकने शेअर केलेल्या व्हिडीओत तो आणि रितेश देशमुख दिसत आहेत. यात अभिषेक रितेशला म्हणतो, “ब्रदर नहीं, फादर. इस लाईन में मैं तुम्हारा बाप हूँ.” हा व्हिडीओ शेअर करताना त्याने “कम ऑन इंडिया” असे लिहित भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच ‘ब्लिड ब्लू’ हा हॅशटॅगही वापरला आहे.
भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले.
हेही वाचा : Photos : ‘या’ फ्लॉप बॉलिवूड चित्रपटांनी पहिल्या दिवशी केलेली कमाई पाहून डोळे पांढरे पडतील
पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. विराट कोहली हार्दिक पंड्याने दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.