Abhishek Bachchan New Movie: बॉलीवूडमधील ज्या अभिनेत्याला ज्युनिअर बच्चन म्हणून ओळखले जाते, तो अभिनेता म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan). २००० साली ‘रेफ्युजी’ चित्रपटातून अभिषेक बच्चनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘ब्रीद : इन टू शॅडोज’, ‘गुरू’, ‘धूम २’, ‘सरकार’, ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘बोल बच्चन’ अशा अनेक चित्रपटांतून विविध भूमिकांद्वारे त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता अभिषेक बच्चन एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार झाला आहे. याची पुष्टी स्वत: अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

एक्सवर एका चाहत्याने अभिषेक बच्चनचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. ज्यांनी अभिषेक सरांचा ‘ब्रीद : इन टू शॅडोज’, ‘रावण’ व ‘बोल बच्चन’ हे चित्रपट पाहिले आहेत. “त्यांना माहीत आहे की, खलनायकाची भूमिका ते किती उत्तम प्रकारे निभावतात. त्यांच्या अभिनयावर कधीही शंका घेऊ नका.” -अशा आशयाची ही पोस्ट आहे. आता या पोस्टला टॅग करीत बिग बींनी “हीच ती वेळ आहे. खूप शुभेच्छा!” असे म्हणत अभिषेक बच्चनला शुभेच्छा दिल्या आहेत.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

Abhishek Bachchan शिवाय हे कलाकार आहेत चित्रपटाचा भाग

सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात किंग खान म्हणजेच शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे; तर अभिषेक बच्चन हा खलनायकाच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची झलक दाखविणार आहे. इतकेच नाही, तर शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान हीदेखील या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखविणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘किंग’ असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे निर्माते आहेत.

शाहरुख खान, सुहाना खान व अभिषेक बच्चन यांचा अभिनय असलेल्या या चित्रपटाविषयी चर्चा होत असली तरीही दिग्दर्शक, निर्माते किंवा कलाकार यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, अभिषेक बच्चन यांच्या चाहत्याने टाकलेली पोस्ट अमिताभ बच्चन यांनी टॅग करीत शेअर केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आता अभिषेक बच्चन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांवर अमिताभ बच्चन यांनी शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, सुहाना खानने झोया अख्तर यांच्या ‘द आर्चिज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता आपल्या वडिलांबरोबर ती या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. शाहरुखने गेल्या वर्षी २०२३ ला ‘पठाण’, ‘जवान’ या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. २०२३ लाच प्रदर्शित झालेला ‘डंकी’ चित्रपट मात्र बाकीच्या दोन चित्रपटांप्रमाणेच ब्लॉकबस्टर ठरू शकला नाही. आता ‘किंग’ चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader