बच्चन कुटुंब हे अनेकदा विविध कारणांमुळे चर्चांचा भाग बनते. त्यामध्ये अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) – जया बच्चन यांच्यापासून अभिषेक(Abhishek Bachchan)-ऐश्वर्याची मुलगी आराध्याचादेखील समावेश असतो. आता अभिषेक बच्चनने नुकत्याच एका मुलाखतीत पालकत्वाबद्दल त्याचा काय दृष्टिकोन आहे, तो याकडे कसे पाहतो यावर वक्तव्य केले आहे.

माझ्या पालकांनी माझे निर्णय…

अभिषेक बच्चनने CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “आई-वडील सर्वोत्तम शिक्षक असतात की नाही, हे मला माहीत नाही. पण, मला वाटते आपल्या भावना आडव्या येतात. आपली इच्छा असते की, आपल्या पाल्याला सर्वोत्तम गोष्टी मिळाव्यात, त्याला यश मिळावे आणि ती दुखावली जाऊ नयेत. आपल्या त्यांच्याप्रति असलेल्या भावना आपले निर्णय बदलवू शकतात. मला वाटते की, पालकांनी त्यांच्या कृतीतून गोष्टी शिकवल्या पाहिजेत. माझ्या पालकांनी मला काय सांगितले आणि मी त्यातून काय शिकलो यापेक्षा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून खूप गोष्टी शिकलो.”

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन जेवायला उत्तरेकडे तोंड करून का बसतात? हरिवंशराय बच्चन यांनी पुस्तकात लिहिलेली आठवण, म्हणालेले…

पुढे याबद्दल अधिक बोलताना अभिषेक बच्चनने म्हटले, “माझ्या पालकांनी माझे निर्णय मला स्वत:ला घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. आतासुद्धा मी एखादा निर्णय घेताना अडखळत असेल, तर मी असा विचार करतो की, माझ्या वडिलांनी किंवा आईने या परिस्थितीमध्ये काय केले असते? याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असता? प्रत्येक माणसासाठी आयुष्यात लवचिकता असणे गरजेचे आहे. आयुष्य सोपे नाहीये. तुम्हाला स्वत:चा बचाव करता आला पाहिजे. हाच निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला लवचिक होता आलं पाहिजे. तुमच्या स्वप्नांना घट्ट धरून त्यासाठी लढता आलं पाहिजे. कारण- हे जग तुम्हाला सहजासहजी ते देणार नाही.”

आताची पिढी असभ्य नाही

आराध्याच्या पालकत्वाविषयी बोलताना अभिषेक बच्चनने म्हटले, “मला वाटते की, आताची पिढी तुम्हाला पुढचा मार्ग दाखवते. मला एका गोष्टीची जाणीव झाली आहे की, आताची पिढी ही खूप वेगळी आहे. ते खूप जिज्ञासू आहेत. आपल्या पालकांनी एखादी गोष्ट सांगितली की, आपण ती ऐकून घेतो. आताच्या पिढीला फार उत्सुकता असते. त्यांना त्याचे कारण जाणून घ्यायचे असते. फक्त आई-वडिलांनी सांगितली म्हणून ते एखादी गोष्ट करत नाहीत. तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं नाही. आज त्यांच्याकडे गूगल आहे. प्रश्न विचारण्यासाठी पालकांकडे जाण्याची त्यांना गरज नाही.”

“आताची पिढी ही त्यांच्या पालकांवर अवलंबून नाही. आपण पालकांचे शहाणपण व अनुभव यांमुळे पालकांवर अवलंबून होतो. आताच्या मुलांच्या सगळं हातात आहे. काहीतरी करण्यासाठी त्यांना फक्त कोणत्या तरी कारणाची आवश्यकता असते आणि हे खूप सुंदर आहे. मी आराध्याबरोबर प्रेमाने वागतो. कारण- मी माझ्या भाच्यांना मोठे होताना पाहिले आहे. मला माहीत आहे की, आराध्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवायच्या आहेत. आताची पिढी असभ्य नाही. आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल”, असे म्हणत अभिनेत्याने पालकत्वाविषयी त्याचे मत सांगितले आहे.

Story img Loader