अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे सध्या विभक्त होणार अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चेदरम्यान, अभिषेक आपल्या आई-वडिलांचे घर सोडून ऐश्वर्यासह नव्या घरी राहायला जाणार असल्याच्याही बातम्या पसरल्या होत्या. मात्र, एकदा एका मुलाखतीत अभिषेकने पालकांबरोबर राहण्याविषयी आपले मत व्यक्त केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००९ मध्ये प्रसिद्ध टीव्ही शो होस्ट ओप्रा विन्फ्री यांनी अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एका मुलाखतीत विचारले होते की, तुम्ही लग्न झाल्यावरही आपल्या पालकांबरोबर राहता याबाबतीत तुमचा काय अनुभव आहे? या प्रश्नावर ऐश्वर्याने उत्तर दिले, “आमच्यासाठी हे खूपच कॉमन आहे.” यावर अभिषेकने अधिक सविस्तर उत्तर देताना सांगितले की, त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनीही आपल्या पालकांबरोबर राहण्याची परंपरा जपली आहे आणि तो स्वतःदेखील त्याच परंपरेचे पालन करत आहे.

हेही वाचा…‘द डर्टी पिक्चर’चा दुसरा भाग येणार का? विद्या बालनच मोठं विधान; म्हणाली, “मी पुन्हा…”

ओप्रा यांनी पुढे विचारले की, “तुम्ही एकत्र जेवता का?” यावर अभिषेकने हसत सांगितले, “आईचा एक नियम आहे, जर आम्ही सगळे एकाच शहरात असू, तर दिवसातून एकदा तरी आम्ही सर्व जण एकत्र जेवतो.”

यानंतर ओप्रा यांना बच्चन कुटुंबाच्या प्रतीक्षा बंगल्यात झालेल्या त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. भारतीय लग्नातील भव्यता पाहून ओप्रा यांनी म्हटले की, “भारतीय लग्न खूपच भव्य असतात.” अभिषेकने लग्नातील परंपरांबद्दल सांगितले की, “भारतीय लग्न आठवडाभर किंवा कधी कधी दहा दिवस चालतात, ज्यामध्ये विविध विधी आणि परंपरा असतात.”

हेही वाचा…‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला दिली होती धमकी; म्हणाला, “मी मोठा तमाशा….”

लग्नातील ‘सप्तपदी’ किंवा ‘सात फेरे’ ऐकून ओप्रा यांनी गमतीने म्हटले की, “इतक्या विधींनंतर मोठ्या लग्नांनंतर घटस्फोट होणं खरंच कठीण जात असेल ना?” यावर ऐश्वर्याने हसत उत्तर दिले, “आम्ही तसा विचार करत नाही.”

सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असून ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan once express his opinion with living with parents jaya and abhishek bachchan aishwarya rai bachchan psg