Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चनने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या संघर्षाच्या काळातील आठवणी शेअर केल्या आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात, जेव्हा त्याच्या अनेक चित्रपटांना अपयश आले आणि समीक्षकांकडून त्याची कामगिरी टीकेचा विषय बनली होती, तेव्हा अभिषेकने अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार केला होता. अशा कठीण वेळी त्याचे वडील आणि बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि एक मोलाचा सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गालट्टा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “त्या काळात माझे अनेक चित्रपट चालले नाहीत, मी कोणाबरोबरही काम केले तरी त्याची पर्वा न करता समीक्षकांनी माझ्या कामगिरीवर टीका केली. मी त्या काळातील नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम करून स्वतःची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या बाजूने काहीच चांगले घडत नव्हते.”

हेही वाचा…अमिताभ बच्चन जास्त पैसे कमवायला जायचे ‘या’ ठिकाणी, वडिलांनी पत्र लिहून दिला होता ‘हा’ सल्ला

अभिषेकने पुढे सांगितले की, त्याच्या करिअरच्या संघर्षाच्या काळात त्याने वडिलांशी संवाद साधला. “मी माझ्या वडिलांना जाऊन म्हटलं, ‘आपण चूक केली आहे, मी या क्षेत्रासाठी योग्य नाही. मी सर्व प्रयत्न करून पाहिले, पण काहीच होत नाही. मला वाटतं, मला प्रामाणिक राहून हे स्वीकारावं लागेल की मी यासाठी पात्र नाही, मी काहीतरी दुसरं करण्याचा विचार करतो.’”

अमिताभ बच्चन यांचा सल्ला

अभिषेकने सांगितले की, त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनी त्याला आधार दिला आणि त्याचा आत्मविश्वास वाढवला. “ते म्हणाले, ‘मी तुला एक वडील नव्हे, तर या क्षेत्रातील एक सीनियर म्हणून सांगतो आहे. तू अजून पूर्ण तयार नाहीस, तुझ्यात सुधारणा होत आहे, पण तुला अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. तुझ्यात एक उत्तम अभिनेता दडलेला आहे. तो किती चांगल्या प्रकारे लोकांसमोर होईल, हे तुझ्या मेहनतीवर अवलंबून आहे. फक्त काम करत रहा, तुला जे चित्रपट मिळतील ते कर. काम केल्याशिवाय तुझं कौशल्य वाढणार नाही.”

हेही वाचा…Video: “तू मराठी आहेस का?”, चाहत्याच्या प्रश्नावर मृणाल ठाकूरने ‘हे’ गाणं गात दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

आधारभूत भूमिकांमधून स्वतःला घडवलं

अमिताभ यांच्या सल्ल्यानंतर अभिषेकने सहाय्यक भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. “मी कोणतीही भूमिका स्वीकारायला सुरुवात केली, मग ती सहाय्यक भूमिका असो, दुय्यम असो किंवा कुठलीही भूमिका असो, त्यातून मला आत्मविश्वास मिळाला. हळूहळू माझ्या कामगिरीवर प्रेक्षकांचा विश्वास निर्माण झाला आणि मी पुन्हा मुख्य भूमिकांसाठी पात्र ठरलो,” असे अभिषेकने नमूद केले.

हेही वाचा…सस्पेन्स अन् ॲक्शन कलाकृती पाहायला आवडतात? वाचा नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजची यादी

अभिषेक बच्चनचा नवीन चित्रपट ‘आय वॉन्ट टू टॉक’ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांत १.५ कोटींचा व्यवसाय केला आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या अभिषेकला पहिले मोठे यश २००४ मध्ये ‘धूम’मुळे मिळाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan opens up about quitting bollywood amitabh bachchan helped him overcome career struggle psg