२३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याने स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ बच्चनसारखं नाव जरी मागे जोडलं गेलं असलं तरी चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभिषेक बच्चनला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची तुलना सतत त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि वडील अमिताभ बच्चन यांच्याशी होताना दिसते. त्याच्यापेक्षा वडील अन् बायको जास्त काम करतात असं म्हणत बऱ्याचदा अभिषेकला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक अपूर्व लाखिया याने बच्चन कुटुंबीयांशी असलेल्या त्यांच्या संबंधाबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी त्याने अभिषेक बच्चनला सुपेरहिरो ‘बॅटमॅन’च्या जागी ठेवलं होतं. अपूर्व त्यावेळी म्हणाला होता की, “जर चित्रपटसृष्टीत सगळेच सुपेरहिरो असतील, सलमान सुपरमॅन असेल, शाहरुख खान स्पायडरमॅन असेल तर मग अभिषेक हा बॅटमॅन आहे. कारण सुपरहीरो होण्याआधी तो एक सामान्य माणूस आहे, जसा ब्रूस वेन हा एक माणूस आहे तसाच अभिषेक बच्चनही तुमच्या आमच्यासारखाच माणूस आहे पण तरी त्याच्यातील गुण हे एका सुपरहीरोप्रमाणेच आहेत.”

आणखी वाचा : “मी निर्मात्यांना पैसे परत केले कारण…”, २०१६ नंतर घेतलेल्या ब्रेकबद्दल अभिषेक बच्चन प्रथमच बोलला

अपूर्वने केलेल्या या कौतुकावर अभिषेकने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना तो म्हणाला, “हे माझ्यासाठी फारच विचित्र आहे. अपूर्व हा आमच्या घरातील एक सदस्यच आहे. ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ची कथा ऐकवायला आल्यापासून आमचं लग्न ते आराध्याच्या जन्मापर्यंत आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखात तो माझ्याबरोबर एका मोठ्या भावाप्रमाणे उभा होता. गेली २० वर्षं तो आमच्या घरचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे तो जे काही बोलला असेल ते माझ्या प्रेमापोटीच असेल.”

२०१६ मध्ये ब्रेक घेतल्यानंतर अभिषेकने वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं. ओटीटीवर आलेल्या ‘दसवी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं. याबरोबरच ‘ब्रीद – इनटू द शॅडोज’ या वेब सीरिजमध्येही अभिषेकने आव्हानात्मक भूमिका निभावली. अजय देवगणच्या ‘भोला’मध्ये अभिषेकचा छोटा कॅमिओदेखील आपल्याला पाहायला मिळाला. सध्या तो आर बल्की यांच्या ‘घूमर’ या चित्रपटावर काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan reacts to a statement of apoorva lakhia that he is batman of bollywood avn