Abhishek Bachchan- Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघे घटस्फोटाच्या चर्चांमुळे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. वैवाहिक जीवनात समस्या असल्याने दोघेही एकत्र राहत नसल्याचं म्हटलं जातंय. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या मुलीबरोबर तर अभिषेक कुटुंबाबरोबर आला होता. तेव्हापासून यांच्या नात्यात सगळं आलबेल नाही, या चर्चांनी जोर धरला.

ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाबरोबर राहत नसून ती मुलीला घेऊन आईबरोबर राहत असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या लेक आराध्याला घेऊन ‘जलसा’ बंगल्यावर गेली होती. तसेच कोणताही कार्यक्रम असो वा फिरायला जायचं असो ऐश्वर्या अन् आराध्या सोबत असतात. बच्चन कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्याबरोबर नसतात. त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल जास्त चर्चा होते. आता अभिषेकचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो ‘जलसा’ बंगल्याबद्दल बोलताना दिसतोय.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने सासरे अमिताभ बच्चन यांच्यासाठी केली पोस्ट, कॅप्शनने वेधले लक्ष

अभिषेक बच्चन आई-वडिलांबरोबर ‘जलसा’ बंगल्यात राहत नाही, असं त्यानेच सांगितलं होतं. एका रेडिट युजरने अभिषेकची ‘मनमर्जियां’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानची २०१८ मधील एक जुनी क्लिप शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये, एका मुलाखतकाराने विकी कौशलला अभिषेकच्या घराचे नाव काय आहे असं विचारलं. त्यावर विकीने ‘जलसा’ म्हटलं. मात्र अभिषेक लगेच म्हणाला की “हे उत्तर चुकीचं आहे. माझे आई-वडील जिथे राहतात ते घर ‘जलसा’ आहे. मी तिथे शेजारीच असलेल्या वत्समध्ये राहतो.”

हेही वाचा – अभिषेकशी लग्न होण्याआधी ऐश्वर्या रायचा अपघात पाहून अमिताभ बच्चन यांची झालेली ‘अशी’ अवस्था; म्हणालेले, “मी तिच्या आईला…”

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्या बच्चन कुटुंबाच्या फॅमिली फोटोत ऐश्वर्याचं नसणं आणि तिने लेकीबरोबर इव्हेंट्सला वेगळं जाणं यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल या चर्चा होत आहेत. तसेच अभिषेकने एक घटस्फोटासंदर्भातील पोस्ट लाइक केली होती, त्यामुळे या दोघांनी ग्रे डिव्हॉर्स घेतलाय, असं म्हटलं गेलं. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायने एक पोस्ट शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्याने आराध्या व अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला होता.

“ती माझी मुलगी नाही,” ऐश्वर्या रायबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेल्या, “मी तिच्याशी…”

नुकत्याच झालेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्या लग्नाची अंगठी घातली होती. त्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल होणाऱ्या चर्चांमध्ये किती सत्य आहे, याबाबत संभ्रम आहे.

Story img Loader