अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. विविध चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका सकारात त्याने प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. नुकतीच त्याने चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली आहेत. अलीकडेच अभिषेक बच्चनची ‘ब्रीद: इनटू द शॅडोज २’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेले अनेक दिवस तो या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्याने अनेक मुलाखती दिल्या, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. यापैकी एका मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्या स्ट्रगलच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिषेक बच्चन परदेशात शिक्षण घेऊन भारतात परातला. घरी कलाकार मंडळी असतानाही मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी नवीन होत्या. यादरम्यान शाहरुख खानने त्याला काही मोलाचे सल्ले दिल्याचे अभिषेकने सांगितले. अभिषेक शाहरुखबद्दल जे काही बोलला तो आता चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा : “करोना महामारीमुळे बॉलिवूड माफिया…” प्रकाश राज यांनी सांगितली हिंदी चित्रपटसृष्टीची दुसरी बाजू

अभिषेक बच्चनने वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान सांगितले की, “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मला नेहमी सांगत असे की, भविष्यात काय करायचे याची काळजी करू नकोस. सध्याच्या घडीला म्हणजे सध्या काय चाललं आहे, याचा विचार आपण करायला हवा. शाहरुख खानने मला नेहमी सांगितले आहे की, काम करताना नेहमी तुझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कर.”

एवढेच नाही तर अभिषेक बच्चनने शाहरुख खानचे खूप कौतुकही केले. अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की, “जे काम मला समजत नाही ते अजिबात करू नकोस, असं मला शाहरुखने तेव्हा सांगितलं. शाहरुखने सांगितलेल्या या गोष्टी मी करिअरचा सल्ला म्हणून घेतल्या आहेत आणि या गोष्टींमधून मला खूप काही शिकायलाही मिळाले आहे.” अभिषेकच्या या बोलण्याने सर्वजण अभिषेक आणि शाहरुखमधील या बॉण्डिंगचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा : ‘पठाण’च्या प्रदर्शनाआधीच त्याच्या सिक्वेलबद्दल शाहरुखचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “आम्ही या चित्रपटासाठी…”

दरम्यान, अभिषेक बच्चनची ‘ब्रीद: इनटू द शॅडोज २’ ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज आहे. २०२० मध्ये या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. आता या सिरीजचा दुसरा भाग आला आहे. दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’च्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे.