Abhishek Bachchan Aishwarya Rai : अभिषेक बच्चनला ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातील अभिनयासाठी एका पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पण, या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारापेक्षा लोकांचे लक्ष ज्या गोष्टीने वेधून घेतले ते म्हणजे अभिषेक आणि अर्जुन कपूर यांच्यातील मजेदार संवादाने. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिषेक बच्चनने ‘आय वॉन्ट टू टॉक’चे दिग्दर्शक शूजित सरकार, त्याचे सहकलाकार आणि क्रू यांचे आभार मानले. तसेच अभिषेकला जेव्हा अर्जुनने एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर ऐकून उपस्थित सर्वजण हसू लागले.
पुरस्कार मिळाल्यावर अर्जुन कपूरने गमतीने अभिषेक बच्चनला प्रश्न विचारला. “अशी कोणती व्यक्ती आहे जी फोन करून म्हणते की अभिषेक, मला तुझ्याशी बोलायचं आहे’ आणि ते ऐकून तुला ताण येतो?” असं अर्जुन कपूरने विचारल्यावर अभिषेक बच्चन काय उत्तर देतो ते पाहुयात.
ऐश्वर्या रायचं नाव घेत अभिषेक काय म्हणाला?
अर्जुन कपूरच्या प्रश्नावर अभिषेक बच्चन म्हणाला, “तुझं अजून लग्न झालेलं नाही, जेव्हा तू लग्न करशील तेव्हा तुला सर्व उत्तरं मिळतील.” अभिषेकचं बोलणं ऐकून प्रेक्षक हसू लागले.

अभिषेक पत्नीबद्दल मिश्किलपणे म्हणाला, “जेव्हा तुम्हाला तुमच्या बायकोचा फोन येतो आणि ती म्हणते, ‘मला तुझ्याशी बोलायचं आहे’, तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही अडचणीत आहात.” ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला आता १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे.
पुरस्कारासाठी अभिषेक बच्चनने मानले आभार
अभिषेक बच्चन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यावर म्हणाला, “हा माझा पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आहे. मी ज्युरींचे आभार मानू इच्छितो. तुम्ही मला या पुरस्कारासाठी पात्र समजलंत, ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. पण याचे श्रेय पूर्णपणे शूजित (सरकार) यांना जातं. त्यांनी इतका अप्रतिम चित्रपट तयार केला आहे. मी माझ्या अहिल्या व पर्लबरोबर हा पुरस्कार शेअर करू इच्छितो. त्यांनी या चित्रपटात खूप छान काम केलं आहे.हा पुरस्कार माझे सहकारी अभिनेते आणि निर्मात्यांसाठी आहे. तुमचे काम मला प्रेरणा देते, आणि मी तुमचा सर्वांचा आदर करतो. कृपया तुम्ही जे करता ते करत रहा. तुम्ही मला रोज सकाळी उठून स्वतःला आणि चांगलं करण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करता.”