अभिषेक बच्चन हा बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. तो नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. नुकताच त्याचा ‘घूमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सैय्यामी खेर प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आता अभिषेकने त्याच्या आणि ऐश्वर्यामधील नात्याचं एक गुपित उघड केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : Video: “बिग बीही मिसळ खातात का?” निलेश साबळेच्या प्रश्नावर अभिषेक बच्चनने केला खुलासा, म्हणाला…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी आहे. या जोडीचे करोडो चाहते आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या देखील दरवेळी एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. याचबरोबर सोशल मीडियावरून देखील ते त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. तर आता एका मुलाखतीमध्ये अभिषेकने चिडल्यावर ऐश्वर्या त्याचा राग कसा शांत करता हे त्याने सांगितलं आहे.

हेही वाचा : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्ने अभिषेक बच्चनची एकदाच नव्हे तर दोनदा घेतली दखल; कारण वाचून व्हाल थक्क

नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये तो म्हणाला, ” जेव्हा मी घरी येतो तेव्हा जर कधी ट्रॅफिक किंवा छोट्या छोट्या कारणाने मी चिडचिड करत असेन तर तर ती मला शांत होण्याचा सल्ला देते. ती म्हणते, तू का छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिड करतो आहेस? आयुष्यात यापेक्षा महत्त्वाच्या भरपूर गोष्टी आहेत. आता तू घरी आला आहेस आणि तुझ्याकडे हसतं खेळतं कुटुंब आहे हे किती महत्वाची गोष्ट आहे.” तर आता अभिषेकचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.