Abhishek Bachchan-Aishwarya Rai Bachchan: अभिषेक बच्चनचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे, मात्र चित्रपटाचे कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. या चित्रपटात एक आजारी बाबा व त्याच्या मुलीच्या गुंतागुंतीच्या नात्याची कथा मांडण्यात आली आहे. आता एका मुलाखतीत अभिषेकने त्याची मुलगी आराध्याबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला. तसेच पाठिंब्यासाठी पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचे आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द हिंदू’शी बोलताना अभिषेकने सांगितलं लहानपणी त्याला कधीही एकटं वाटलं नाही. त्याचं सगळं श्रेय त्याची आई जया बच्चन यांना जातं. मुलांचे संगोपन करण्यासाठी जया बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेतला होता. “माझ्या जन्मानंतर माझ्या आईने अभिनयातून ब्रेक घेतला, कारण तिला मुलांसोबत वेळ घालवायचा होता. बाबा आजूबाजूला नसल्याचं आम्हाला कधीच जाणवलं नाही,” असं अभिषेक म्हणाला.

हेही वाचा – “खूप झालंय आता, मला…”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन असं का म्हणाला?

अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला…

अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होत आहेत. अशातच अभिषेकने पत्नीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’चे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी जया बच्चन यांनी मुलांसाठी केलेल्या त्यागाकडे लक्ष वेधलं. त्याचवेळी अभिषेकने त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचा उल्लेख केला. “मी नशीबवान आहे की मला बाहेर जाऊन चित्रपट करायला मिळतात; कारण मला माहीत आहे की ऐश्वर्या आराध्यासोबत घरी आहे आणि त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो,” असं अभिषेक बच्चन म्हणाला.

हेही वाचा – अभिषेक बच्चनच्या चित्रपटाला प्रेक्षक मिळेना; I Want To Talk सिनेमाचे ३ दिवसांचे कलेक्शन फक्त ‘इतके’

आई-वडिलांना मुलं खूप प्रेरणा देतात, असं अभिषेकने सांगितलं. “आई-बाबा झाल्यावर तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देतात. गरज असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी एका पायावर पर्वत चढू शकता. खासकरून सर्व माता व महिलांबद्दल मी आदराने बोलतोय. कारण त्या जे करतात ते कोणीच करू शकत नाही. पण एक बाबा या सगळ्या गोष्टी शांतपणे करतो कारण त्याला व्यक्त कसं व्हावं ते समजत नाही. वाढत्या वयानुसार मुलांना कळते की त्यांचे वडील किती मजबूत आहेत. ते कदाचित बॅकग्राउंडमध्ये असतील पण ते नेहमी तिथे असतात,” असं अभिषेक म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan talks about aishwarya rai bachchan amid divorce rumors hrc