आपले वडील अमिताभ बच्चन यांच्या पडत्या काळात मुलगा अभिषेक बच्चन अमेरिकेतील कॉलेज सोडून भारतात आला खरा, पण याचदरम्यान त्याला जे.पी दत्ता यांनी ‘रेफ्यूजी’मध्ये मुख्य भूमिका देऊ केली अन् अभिषेकचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. ‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिषेकने त्याच्या या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं, त्याने बऱ्याच दिग्दर्शकांकडे विचारणा केली होती. पण कोणताच दिग्दर्शक व निर्माता अमिताभ बच्चन यांच्या मुलाला लॉंच करायचं धाडस करू इच्छित नव्हता.

एके दिवशी ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्याला अमिताभ यांनी अभिषेकलाही बोलावलं आणि तिथेच जे.पी.दत्ता यांना ‘रेफ्यूजी’साठी त्यांचा हीरो मिळाला. त्या फिल्मफेअर सोहळ्याला हजेरी लावताना अभिषेककडे फारसे चांगले कपडेदेखील परिधान करायला नव्हते कारण तेव्हा संपूर्ण बच्चन कुटुंबीय हे एका वेगळ्याच आर्थिक संकटाचा सामना करत होतं. अमिताभ बच्चन यांनी दिवाळखोरी जाहीर केली होती. याचविषयी अभिषेकने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप

अभिषेक म्हणाला, “२० वर्षांपूर्वी ‘फिल्मफेअर’ला जायचं म्हणजे बरीच तयारी करावी लागायची, अन् त्यावेळी कुणीही कपडे तुम्हाला फुकटात देत नसत, तुम्हाला नवे कपडे खरेदी करावे लागत असे. संपूर्ण इंडस्ट्री त्या सोहळ्याला हजर असायची कित्येकांना नमांकनदेखील नसायचे पण तरी ते तिथे यायचे. तेव्हा मला मी काय परिधान करू हा प्रश्न पडला होता. आत्ता हे सांगायला फार विचित्र वाटतं पण तेव्हा माझ्याकडे फारसे चांगले कपडे नव्हतेच, आमची चांगले कपडे घ्यायची तेव्हा ऐपत नव्हती कारण आम्ही सगळेच एका मोठ्या समस्येचा सामना करत होतो.”

आणखी वाचा : “जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड…”, सुशांत सिंग राजपूतचे किसिंग सीन पाहिल्यावर ‘अशी’ होती अंकिता लोखंडेची प्रतिक्रिया

पुढे अभिषेक म्हणाला, “तेव्हा माझ्याकडे फॉर्मल असे चांगले कपडे फार नव्हते अन् जीन्स आणि टी-शर्टमध्ये त्या सोहळ्याला जाणं काही मला योग्य वाटत नव्हतं. मी माझ्या बहीणीच्या लग्नात काही वर्षांपूर्वी शिवलेली शेरवानी परिधान करून त्या सोहळ्याला गेलो.” त्यावेळी जे.पी.दत्ता यांना ‘बॉर्डर’साठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. जेव्हा ते पुरस्कार घेऊन मंचावरून खाली उतरत होते तेव्हा त्यांची नजर अभिषेकवर पडली अन् अभिषेकला त्या लुकमध्ये पाहून त्यांनी त्याला आपल्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बोलावले अन् अशा रीतीने अभिषेक बच्चनला त्याचा पहिला चित्रपट मिळाला.