Abhishek Bachchan Video: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक व सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा मागच्या वर्षभरापासून होत आहेत. ऐश्वर्याने बिग बींचं घर सोडलं असून ती आई वृंदा राय यांच्याबरोबर राहतेय, मुलगी आराध्यादेखील तिच्याबरोबर राहते, असं म्हटलं जात आहे. अशातच अभिषेकचा आई जया बच्चन (Jaya Bachchan) व बहीण श्वेता बच्चन (Shweta Bachchan) यांच्याबरोबरचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अभिषेक बच्चन, त्याची आई जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन मंगळवारी रात्री एकत्र मुंबईत पोहोचले. त्यांचे मुंबई विमानतळावरून बाहेर पडतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इन्स्टाग्रामवर ‘विरल भयानी’ या पापाराझी अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेकने विमानतळातून बाहेर पडताना पापाराझींना हात जोडले. अभिवादन केले आणि त्याच्या कारकडे चालत गेला. तर, जया बच्चन त्यांच्या कारकडे चालत गेल्या आणि श्वेता पापाराझींकडे बघत हसून निघून गेली.

Stree 2: श्रद्धा कपूरचा ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार? माहिती आली समोर

अभिषेक बच्चनचा व्हिडीओ –

या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींना ऐश्वर्या व आराध्या कुठे आहेत, असं विचारलं आहे तर काहींनी श्वेता नंदा सतत बच्चन कुटुंबाबरोबर का असते असं विचारलं आहे. ‘अभिषेक आपल्या आई व बहिणीबरोबर फिरतो, आराध्या व ऐश्वर्या एकट्या फिरायला जातात,’ ‘ऐश्वर्या कुठे आहे?’ ‘आम्हाला वाटायचं नणंद आल्याने भांडणं फक्त सामान्य कुटुंबात होतात,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर युजर्सनी केल्या आहेत.

Aishwarya rai bachchan (1)
व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)
aaradhya bachchan
व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

फक्त आठ कोटी बजेट असलेल्या ‘या’ बॉलीवूड सिनेमाने कमावले १०४ कोटी; पटकावले तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अमिताभ बच्चन…

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता, तर ऐश्वर्या राय व आराध्या वेगळ्या आल्या होत्या तेव्हापासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकत्याच ऐश्वर्या व आराध्या दोघाही एकट्याच न्यूयॉर्कला फिरायला गेल्या होत्या, अभिषेक बच्चन त्यांच्याबरोबर नव्हता. असं अनेकदा घडल्याने या जोडप्याच्या नात्यात सगळं आलबेल नाही, असं म्हटलं जात आहे. यासंदर्भात आतापर्यंत ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.

Story img Loader