अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवणारा कपिल शर्मा त्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’चे नवे पर्व सध्या सुरु आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने भूषवले आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या कार्यक्रमामुळे त्याची लोकप्रियता वाढत गेली. या काळात त्याने काही विनोदी चित्रपटदेखील केले.

कपिल शर्माने नुकत्याच एका चित्रपटामध्ये काम केले आहे. ‘ज्विगाटो’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. यामध्ये त्याने एका डिलीव्हरी बॉयचे पात्र साकारले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलरवरुन हा चित्रपट काहीसा गंभीर स्वरुपाची असल्याचे पटकन लक्षात येते. कपिलने याआधी अशा प्रकारची गंभीर भूमिका केली नसल्याने त्याचे चाहते ‘ज्विगाटो’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टीमने सध्या सुरु असलेल्या ‘बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये हजेरी लावली आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

आणखी वाचा – ‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…

रेडिफला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने या चित्रपटाविषयी आणि त्याच्या भूमिकेविषयी माहिती दिली. तो म्हणाला, “जर हा चित्रपट चालला नाही, तर फारसा फरक पडणार नाही. पण जर माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आणि चित्रपट प्रेक्षकांना आवडला, तर मी अशा भूमिका करायचे धाडस पुन्हा करु शकेन असे मी माझ्या पत्नीला म्हणालो आहे. प्रेक्षकांना माझं काम आवडेल अशी मला आशा आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहायला हवा”

आणखी वाचा – पायल रोहतगीचं साजिद खानला समर्थन, बॉलिवूडसंबंधी वक्तव्यावरून मंदाना करीमीला सुनावलं

या मुलाखतीमध्ये त्याला ‘कॉमेडी शो करत असताना ‘ज्विगाटो’सारखा चित्रपट करताना भीती वाटली का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कपिलने ‘कॉमेडी शो करणं मी कधीही सोडणार नाही. त्यांच्या बळावर मी नवं काहीतरी करायचा प्रयत्न करु शकतो. भीतीचं म्हणालं तर माझा शो सुरु आहे. तो लोकांना आवडतोय. मग मी का घाबरु’ असे उत्तर दिले.

Story img Loader