२१ वर्षांपूर्वी गुजरातमधील गोध्रा प्रकरण आजही लोकांच्या स्मरणात आहे. या दुर्घटनेची जखम आजही भरून निघालेली नाही. ‘अंत आया’ घटनेवर भाष्य करणारा एक स्वतंत्र चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक एम.के. शिवाक्ष यांचा ‘अपघात की षडयंत्र गोध्रा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून लोक या चित्रपटाची मागणी करत होते.

या एक मिनिटाच्या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नसून त्या घटनेशी निगडित बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. हा टीझर दावा करतो की हा चित्रपट २००२ च्या गोध्रा दुर्घटनेच्या सत्य घटनांवर बेतलेला आहे. साबरमती एक्स्प्रेस, कोच एस६, ५९ हे आकडे अत्यंत ठळकपणे यात दाखवण्यात आले आहेत.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले

आणखी वाचा : नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘जोगीरा सारा रा रा’ बॉक्स ऑफिस सपशेल आपटला; पाच दिवसांत कामावेल ‘इतके’ कोटी

या गाडीच्या एस६ कोचला आग लावण्यात आली होती आणि मीडिया रिपोर्टनुसार यात ५९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली उसळल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार या दंगलीत २००० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता.

चित्रपटाच्या टीझरमध्ये या सगळ्या गोष्टी ठळकपणे मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटातील संवाद, त्यातील कलाकार, प्रदर्शनाची तारीख याबद्दल काहीच माहिती मिळाली नसून या टीझरमधून ‘अपघात की षडयंत्र’, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. याआधीसुद्धा या प्रकरणावर ‘काय पो छे’, ‘परजानिया’, ‘फिराक’सारखे चित्रपट बॉलीवूडमध्ये बनले आहेत, पण या नव्या चित्रपटाने ज्या पद्धतीने हा विषय हाताळला आहे ते पाहता नक्कीच याची चर्चा होणार यात काहीच शंका नाही.