हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेला ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचा आहे. पहिल्यांदा प्रदर्शित होऊन फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा त्यात काही बदल करून प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ने त्यावेळी सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. सलीम खान व जावेद अख्तर म्हणजेच सलीम-जावेद या सुप्रसिद्ध लेखक जोडगोळीने या चित्रपटाचं लेखन केलं होतं. या चित्रपटाने संपूर्ण चित्रपटसृष्टीलाच एक वेगळं वळण दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, अमजद खान आणि जया बच्चन यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. या सगळ्यांच्या कामाचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले. आजही या चित्रपटातील सगळी पात्र ही लोकांच्या अत्यंत आवडीची आहेत. ‘शोले’च्या पडद्यामागील बऱ्याच गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत, पण आज आपण या एव्हरग्रीन ब्लॉकबस्टर अशा चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाविषयी जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : आशुतोष गोवारीकर यांना ‘लगान’ व ‘स्वदेस’ हे चित्रपट न करण्याचा जावेद अख्तर यांनी दिलेला सल्ला; वाचा नेमका किस्सा

‘न्यूज १८’च्या रीपोर्टनुसार ‘शोले’ हा चित्रपट त्याकाळी ३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला. त्यावेळी धर्मेंद्र यांना तब्बल १.५ लाख रुपये इतकं मानधन देण्यात आलं होतं, ज्यानंतर ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता ठरले. त्यानंतर संजीव कुमार यांना सर्वाधिक मानधन म्हणजेच १.२५ लाख रुपये देण्यात आले होते. अमिताभ यांची या चित्रपटातील प्रमुख भूमिका असूनही त्यांना मात्र संजीव कुमार यांच्यापेक्षा कमी मानधनच देण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांना ‘शोले’साठी १ लाख रुपये मानधन देण्यात आलं होतं.

याच मीडिया रीपोर्टनुसार हेमा मालिनी यांना ७५००० रुपये तर मुख्य खलनायक अमजद खान यांना ५०००० रुपये इतकं मानधनच देण्यात आलं होतं. तर छोटी पण अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका निभावणाऱ्या जया बच्चन यांना ‘शोले’साठी केवळ ३५००० रुपये मानधनच देण्यात आलं होतं. त्यावेळी चित्रपटाच्या मुख्य स्टारकास्टपैकी जया बच्चन यांनाच सर्वात कमी मानधन देण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acting fees of starcast of sholay and how much fee was given to jaya bachchan avn