बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने मुंबईत आणखी एक नवीन प्रॉपर्टी विकत घेतली आहे. अजयने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे कार्यालयासाठी मोठी जागा खरेदी केली आहे. अजयने खरेदी केलेल्या या जागेची किंमत तब्बल ४५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजयकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

हेही वाचा- शाहरुख खानला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी करावी लागली शस्त्रक्रिया

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजयने ही प्रॉपर्टी मुंबईच्या पॉश भागात असलेल्या अंधेरी वेस्टमध्ये घेतली आहे. ही एक कार्यालयीन जागा असून ही जागा १३ हजार २९३ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. ही मालमत्ता ओशिवराच्या सिग्नेचर इमारतीच्या १६व्या मजल्यावर आहे. या मालमत्तेच्या खरेदीसाठी अजय देवगणने स्वतंत्रपणे १ कोटी ८२ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

हेही वाचा- “माझ्या शरीराचा गैरवापर…”; विद्या बालनने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली…

ही प्रॉपर्टी अजय देवगणचे खरे नाव वीरेंद्र देवगण नावाने १९ एप्रिल २०२३ रोजी नोंदवले गेली होती. काजोलचे मुंबईतील घर १६ कोटी ५ लाख रुपयांना खरेदी केल्यानंतर या जागेची नोंदणी करण्यात आली होती. ADF व्यतिरिक्त, अजयची एक व्हिज्युअल इफेक्ट कंपनी NY VFXWAALA देखील आहे. या कंपनीचे नाव त्याची मुलं मुलांनी न्यासा आणि युग देवगण यांच्या नावावर ठेवलं आहे आहे. या कंपनीने ‘प्रेम रतन धन पायो’, ‘तमाशा’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरसाल’, ‘दिलवाले’, ‘फोर्स 2’ आणि ‘सिम्बा’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र, अजयने ही जागा नेमक्या कोणत्या ऑफिससाठी घेतली आहे हे अद्याप कळलेले नाही.

हेही वाचा- “माझं करिअर बरबाद झालं”, विक्रम भट्टबरोबरच्या अफेअरबद्दल अमीषा पटेलने सोडलं मौन; म्हणाली, “१३ वर्षे मी…”

दरम्यान, अजयच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अजय रोहित शेट्टीच्या ‘सिंघम ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून दीपिका पादुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेतही पदार्पण करत आहे. याशिवाय ‘गोलमाल ४’ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader