बिग बॉस ७’ फेम अभिनेता एजाज खानला २०२१ साली ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) मार्च २०२१मध्ये एजाजविरोधात ही कारवाई केली होती. दोन वर्ष तुरुंगावास भोगल्यानंतर एजाज खान जामीनावर सुटला आहे. नुकतचं एका मुलाखतीत एजाज खानने तुरुंगातील त्या भयानक आठवणींवर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘लस्ट स्टोरी २’ बघताना खोलीत अचानक कुणी आले तर काय करायचं? तमन्ना भाटियाने सांगितला पर्याय, म्हणाली….

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एजाज म्हणाला, “तुरुंगातील एक दिवस मला वर्षभरासारखा वाटतो. ज्या व्यक्तीने माझ्यावर केस केली त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. जग त्याच्याबरोबर काय घडत आहे ते पाहत आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. निकाल लागण्यापूर्वीच मला दोषी घोषित करण्यात आले. शेवटी मला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. मी २६ महिने तुरुंगात होतो. माझे काम चुकले आणि माझा मुलगा मोठा झाला.”

हेही वाचा- महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्याचा आलिया भट्टच्या आईला होता पश्चाताप, सावत्र लेक पूजाचा मोठा खुलासा

एजाजने आर्थर रोड जेलचे वर्णन जगातील सर्वात जास्त गर्दीचे कारागृह म्हणून केले आहे. ८०० लोकांच्या क्षमतेच्या तुलनेत ३५०० कैदी या कारागृहात राहतात. याबाबत बोलताना एजाज म्हणाला, “ कारागृहात एका टॉयलेटमध्ये ४०० लोक जातात. त्यामुळे तिथल्या स्वच्छतागृहातील परिस्थितीची कल्पना करा. या घटनेमुळे मी तणाव आणि नैराश्यातून गेलो. जगणे माझ्यासाठी कठीण होते पण मला माझ्या कुटुंबासाठी जगावे लागले. ज्यात माझे ८५ वर्षांचे वडील, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.”

काय आहे प्रकरण?

२०२१ साली चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना मागणीप्रमाणे अंमलीपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शादाब शेख उर्फ शादाब बटाटा याला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी शादाबची चौकशी केल्यानंतर एजाज खानचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबी पथकाने एजाजला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे अल्प्राझोलमच्या ४.५ ग्रॅमच्या ३१ गोळ्या सापडल्या होत्या. चौकशीनंतर एजाजला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा- “तू खूप चुकीचं केलंस…,” श्रेया घोषालचे चाहते करण जोहरवर नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

एजाज खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर तो ‘बिग बॉस ७’ मध्ये दिसला होता. त्याने २००३ मध्ये आलेल्या ‘पथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याने २००७ च्या एकता कपूरच्या टीव्ही शो ‘क्या होगा निम्मो का’ मध्येही काम केले. ‘हमारे महाभारत की’, ‘करम अपना अपना’ आणि ‘रहे तेरा आशीर्वाद’ या मालिकांमध्येही तो दिसला होता. बॉलीवूड क्लब हा रिअॅलिटी शोही त्याने जिंकला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ajaz khan on his arthur road jail days said depression while being imprisoned in drug case dpj