बॉलीवूडमधून आज एक दु:खद बातमी आली. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात ग्रंथपाल दुबेची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन झालं. राहत्या घरात त्यांचं निधन झालं, अशी माहिती त्यांची पत्नी सुझान बर्नर्टने ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली. अखिल यांचं निधन झालं त्यावेळी सुझान हैदराबादमध्ये शुटिंग करत होती.
या जोडप्याच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, अखिल यांना रक्तदाबाशी संबंधित समस्या होत्या. ते स्वयंपाकघरात एका स्टूलवर चढून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
अखिल मिश्रा हे मीरा रोड परिसरात राहत होते आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अखिल यांचा अपघात झाला तेव्हा सुझान हैद्राबादमध्ये शुटिंग करत होती. अपघाताची बातमी समजताच ती तातडीने मुंबईला आली. अखिल यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सुझानला पतीच्या अचानक निधनाचा धक्का बसला आहे. “माझं हृदय तुटलं आहे, माझा जीवनसाथी गेला आहे,” असं सुझान पतीच्या निधनानंतर म्हणाली.
अखिल मिश्रांनी दोन लग्नं केली होती. त्यांनी १९८३ मध्ये मंजू मिश्राशी लग्न केले पण दोघेही १९९७ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी जर्मन अभिनेत्री सुझानशी लग्न केले. अनुपम खेर यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात सुझानने सोनिया गांधींची भूमिका साकारली होती.