‘जॉली एलएलबी’ आणि ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘जॉली एलएलबी ३’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जेव्हापासून ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून चाहते म्हणत होते की, पहिल्या दोन्ही चित्रपटातील वकील म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार व अरशद वारसी यांना एकाच केसमध्ये आमने-सामने आणा. आता चाहत्यांची हिच इच्छा पूर्ण होणार आहे. ‘जॉली एलएलबी ३’मध्ये अक्षय व अरशद एकत्र पाहायला मिळणार आहेत.

बहुचर्चित ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाच्या शूटिंगला अजमेरमध्ये सुरुवात झाली आहे. अभिनेता अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत शूटिंग सुरू झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. व्हिडीओमध्ये अक्षय व अरशद आपणच खरा जॉली असल्याचा दावा करताना दिसत आहेत. एकाबाजूला अरशद म्हणतोय, “जगदीश त्यागी उर्फ जॉली, बीए एलएलबी. डुप्लीकेटपासून सावधान.” तर दुसऱ्याबाजूला अक्षय म्हणतोय की, “जगदीश्वर मिश्रा, बीए एलएलबी, ऑरिजिनल जॉली (लखनऊ वाले).”

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

हेही वाचा – “कधी आपल्या डोळ्यात पाणी आणतो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाला…

या दोघांनंतर व्हिडीओमध्ये सौरभ शुक्ला दिसत असून त्यांनी दोन्ही चित्रपटांमध्ये न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठीची भूमिका साकारली होती. व्हिडीओत, सौरभ यांच्या हाती पाटी दिसत आहे; ज्यावर ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असं लिहिलं आहे. पण आता खरा जॉली कोण अक्षय कुमार की अरशद वारसी? हे येत्याच काळात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, २०१३साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘जॉली एलएलबी’ चित्रपटात अरशद वारसी झळकला होता. या चित्रपटातील त्याची विनोदी शैली अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या चित्रपटात अरशदसह अभिनेते बोमन इराणी होते. दिल्लीमधील एका कोर्टातील ड्रामा या चित्रपटात पाहायला मिळाला होता.

हेही वाचा – “मला उत्तम मान अन् पैसे…”, प्रसाद ओकने हिंदीत काम न करण्यामागचं कारण केलं स्पष्ट, म्हणाला…

त्यानंतर २०१७मध्ये ‘जॉली एलएलबी २’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात लखनऊ कोर्टातील प्रकरण दाखवण्यात आलं होतं. अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात जॉलीच्या भूमिकेत झळकला होता. ‘जॉली एलएलबी’च्या चाहत्यांनी अक्षयच्या एन्ट्रीवर नाराजी व्यक्त केली होती. पण नंतर अक्षयचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. माहितीनुसार, आता ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटात दोन्ही जॉली आमने-सामने पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader