अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘राम सेतु’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तिथपासून चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आता अखेरीस ‘राम सेतु’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्येच त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील अक्षयचा नवा लूक व भूमिका पाहता प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित कधी होणार? याची वाट पाहत आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवाद विशेष लक्षवेधी आहेत. त्याचबरोबरीने चित्रीकरणासाठी निवडण्यात आलेले लोकेशनही कमालीचे आहेत. ट्रेलर पाहता चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या ट्रेलरमधील जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स विशेष लक्षवेधी आहेत.

पाहा ट्रेलर

चित्रपटाची कथा ही एका आर्कियोलॉजिस्टवर आधारित आहे. ‘राम सेतु’ खरंच अस्तित्वात होतं का? की ही निव्वळ काल्पनिक कथा आहे याचा शोध घेण्यासाठी अक्षयची निवड करण्यात येते. भारत-श्रीलंकाच्यामध्ये असलेल्या राम सेतुभोवती या चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी मनोरंजनाच्या दृष्टीने प्रेक्षकांना काहीतरी नवं पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

अ‍ॅक्शन, थ्रीलर, रोमान्स असलेल्या या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचाही मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हा ट्रेलर कंटाळवाणा असल्याचंही म्हटलं आहे. तर काहींनी ट्रेलर पाहून अक्षयचं कौतुकही केलं आहे. येत्या २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Story img Loader