शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. नुकतंच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युएसएमध्ये ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने प्रदर्शनाअगोदरच १.२ कोटींचा व्यवसाय केला आहे. युएसएनंतर आता जर्मनी आणि ऑस्ट्रेलियातही या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटांच्या कमाईबद्दल काही लोकांनी अंदाजसुद्धा बांधले आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेता आणि समीक्षक केआरके अर्थात कमाल आर खान याने शाहरुखच्या ‘जवान’च्या कमाईबद्दल काही अंदाज बांधले आहेत.

cm Devendra fadnavis cancelled schemes
शिंदेंच्या काळातील योजनांना कात्री? आर्थिक संतुलनासाठी सरकारचा विचार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
BMC financial condition information in marathi
घटलेल्या मुदतठेवी आर्थिक स्थितीचा एकमेव निकष नाही; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे मत
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Need for economic reforms Recommendation to create 8 million jobs annually
आर्थिक सुधारणांची गरज! सर्वंकष नियमन सुधारणा, वार्षिक ८० लाख रोजगार निर्मितीची शिफारस
Thane district faces fund shortage due to low funding last year and further cuts this year
ठाणे जिल्हा निधीसाठी तहानलेलाच
सोलापुरात ६२०.८० कोटींपैकी दहा महिन्यांत केवळ २३३.४५ कोटी खर्च; विकास आराखड्याला मर्यादा, निवडणूक आचारसंहितेचाही फटका
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”

आणखी वाचा : ‘गदर २’च्या यशानंतर सनी देओल घेणार ५० कोटी मानधन? अभिनेता खुलासा करत म्हणाला…

आपल्या ट्वीटमध्ये केआरके म्हणाला, “शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग कलेक्शनसाठी सज्ज आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट भारतात ७५ कोटींची कमाई करेल तर जगभरात हा चित्रपट १२५ कोटींचा गल्ला जमवेल. इतकंच नव्हे तर पहिल्या वीकेंडला या चित्रपटाची जगभरातील कमाई ही ४०० कोटींपर्यंत पोहोचेल.”

केआरकेच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. शाहरुख खानने स्वतः फोन करून सांगितलं का? असा खोचक सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader