१२ ऑक्टोबर २०१८ साली भारतीय चित्रपटसृष्टीचे मापदंड मोडीत काढणारा ‘तुंबाड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ वर्षं ह्या कलाकारांनी मेहनत घेतली. राही अनिल बर्वे यांनी सर्वस्व पणाला लावून हा चित्रपट बनवला. अभिनेता आणि निर्माता सोहम शाह यानेदेखील यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. मध्यंतरी लेखक आणि दिग्दर्शक राही बर्वे यांनी ‘तुंबाड’चे पुढचे भाग येणार नाहीत हे स्पष्ट केलं होतं.

खरंतर ‘तुंबाड’ सुपरहीट झाल्यापासूनच त्याच्या पुढील भागाबद्दल जबरदस्त चर्चा सुरू होती. आता नुकतंच याच्या पुढील भागाबद्दल चित्रपटातील अभिनेता आणि निर्माता सोहम शाह याने भाष्य केलं आहे. तुंबाडच्या दुसऱ्याच नव्हे तर तिसऱ्या भागाबद्दलही त्याने खुलासा केला आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : ‘The Kerala Story’पाठोपाठ ‘Kerala Crime Files’ या वेसबीरीजची चर्चा; टीझरही झाला प्रदर्शित

बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना सोहम म्हणाला, “आम्हाला खरंच तुंबाड २ आणि ३ बनवायला आवडेल, पण आत्ता त्याच्यावर काम सुरू केलेलं नाही. त्याच्या लिखाणावर काम सुरू आहे. तुंबाड प्रदर्शित होऊन ५ वर्षं उलटली आहेत, तेव्हापासून आम्ही प्रयत्न करत आहोत पण म्हणावी तशी कहाणी कागदावर उतरत नाहीये. आम्हाला याचे पुढील भाग बनवायला आवडेल पण केवळ पहिला चित्रपट हीट ठरलाय म्हणून नाही. तर दुसऱ्या भागाची कथादेखील तितक्याच ताकदीची हवी. जेव्हा तुम्हाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं तेव्हा एक उत्तम कथा देणं ही तुमची प्रमुख जबाबदारी असते.”

बऱ्याच निर्मात्यांनी आयत्यावेळी चित्रपटातून काढता पाय घेतल्यावर ‘तुंबाड’च्या निर्मितीची जबाबदारी सोहमने घेतली होती. नुकतंच सोहम शाह हा सोनाक्षी सिन्हाच्या ‘दहाड’ या वेबसीरिजमध्येदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकला. तर तुंबाडचे दिग्दर्शक राही बर्वे हे सध्या त्यांच्या ‘गुलकंद’ या आगामी वेबसीरिजच्या कामात व्यस्त आहेत. ‘तुंबाड’च्या पुढच्या भागांची प्रेक्षक खरंच फार आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader