बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी ८ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. गुरुग्राममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज मुंबईत त्यांच्या कुटुंबीयांनी दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये विद्या बालन, अनुपम खेर यांसारखे अनेक दिग्गज कलाकार पोहोचले आणि त्यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनुपम खेर यांची सतीश कौशिक यांच्यासाठी भावनिक पोस्ट
सतीशचे कौशिक यांचे सगळ्यात जवळचे मित्र आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या प्रार्थना सभेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ स्लोमोशन आहे. ज्यामध्ये अनुपम दिवंगत अभिनेत्याच्या फोटोला पुष्प अर्पण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने पुन्हा एकदा त्याच्या मित्रासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी लिहिले आहे, “जा, तुला मी माफ केलं, मला एकटं सोडण्यासाठी. लोकांच्या स्मितहास्यांमध्ये मी तुला नक्कीच शोधेन. पण रोज मला आपल्या मैत्रीची उणीव भासेल. गुडबाय माय मित्रा. बॅकग्राउंडमध्ये तुझं आवडतं गाणं लावलं आहे. तू पण लक्षात ठेवशील”. अशी भावनिक पोस्ट अनुपम खैर यांनी शेऊर केली आहे व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’ हे गाणं सुरू आहे.
हेही वाचा- “शाहरुख खान अपयशी…” अनुभव सिन्हा यांनी सांगितलं ‘रा.वन’ चित्रपट फ्लॉप होण्यामागील कारण
खेर यांच्या पोस्टवर चाहते भावूक
अनुपमचा हा व्हिडिओ पाहून चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत आणि व्हिडिओवर कमेंटकरत आहेत. यावर करताना एका यूजरने ‘मित्र असावा तर असा’, अशी कमेंट केली आहे. तर दुसर्याने लिहिले, “त्यांची कॅलेंडर भूमिका कधीही विसरू शकत नाही.” अशी भावनिक कमेंट केली आहे.
यापूर्वी, सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर अनुपम यांनी हा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघेही हसत हसत कॅमेऱ्यासाठी पोज देत होते. हे शेअर करताना अनुपम यांनी लिहिले होते, “मला माहित आहे की मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे.. पण मी जिवंत असताना माझ्या जिवलग मित्र #SatishKaushik बद्दल हे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम. तुझ्याशिवाय सतीश..ओम शांती आयुष्य सारखे होऊ शकत नाही.