अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेससाठी देखील ओळखला जातो. सध्या मात्र अर्जुन रामपाल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रीएलाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. अर्जुन व पालक दुसऱ्यांदा पालक होणार आहेत.
मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत दुसर्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली. ती अभिनेता अर्जुन रामपालला डेट करत आहे आणि या जोडप्याला आधीच तीन वर्षांचा मुलगा आहे. फोटो शेअर करताना गॅब्रिएलाने “हे खरंच आहे की एआय आहे?” असं कॅप्शन दिलं. फोटोंमध्ये गॅब्रिएलाने फ्लोय ऑरेंज गाउन घातला आहे.
गॅब्रिएलाने फोटो पोस्ट केल्यावर त्यावर अर्जुन रामपालने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. तसेच काजल अग्रवालसह इतरही कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुन रामपाल आणि त्याची पहिली पत्नी मेहेर जेसिका यांनी २१ वर्षांच्या संसारानंतर २०१९ मध्ये घटस्फोट घेतला. तेव्हापासून अर्जुन गॅब्रिएलाला डेट करतोय. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहे, तर गर्लफ्रेंडपासून एक मुलगा आहे. आता तो पुन्हा एकदा बाबा होणार आहे.