बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले आशिष विद्यार्थी हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले. आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता त्यांनी दुसरं लग्न का केलं आणि त्यांची पहिली भेट कशी झाली, याबद्दल सविस्तर भाष्य केले आहे.

आशिष विद्यार्थी यांनी नुकतंच फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी पहिल्या पत्नीशी घटस्फोट, लग्न, लग्नाचे वय आणि लव्हस्टोरी सांगितली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या चाहत्यांनी मी ६० वर्षाचा नसून ५७ वर्षांचा आहे, असेही ठणकावून सांगितले आहे.
आणखी वाचा : “तुम्हाला आशीर्वाद…” आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट, म्हणाली “खूप खंबीर…”

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”

“मी माझी पत्नी राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीशी घटस्फोट घेतला. पण त्यानंतर मला कुठेतरी असं वाटतं होतं की मी पुन्हा लग्न केले पाहिजे. कारण माझ्या आयुष्याचा उर्वरित प्रवास मी जोडीदाराबरोबर करायला हवा, असं मला माझे मन सांगत होतं. मी याबद्दल विचार करायला लागलो. हा विचार करत असताना मी ५५ वर्षांचा होतो आणि मला पुन्हा लग्न करायचं यावर मी ठामपणे निर्णय घेतला.

त्यानंतर मग माझ्या आयुष्यात रुपाली बरुआ आली. आम्ही एकमेकांशी चॅट करत होतो. चॅट केल्यानंतर काही दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटलो. यानंतर मग आम्हाला आमच्या नात्यात मैत्रीपलीकडे काहीतरी आहे, असे जाणवलं. त्यावेळी आम्ही आयुष्यात पती-पत्नी म्हणून एकत्र येऊ शकतो, असं आम्हाला वाटले आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला”, असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले.

आणखी वाचा : “कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान आशिष आणि त्यांची पहिली पत्नी राजोशी यांना २३ वर्षांचा मुलगा आहे. तर आशिषची दुसरी पत्नी गुवाहाटी येथील रहिवासी असून ती व्यवसायिक आहे. ती कोलकात्यात एक अपस्केल फॅशन स्टोअर चालवते.

Story img Loader