सध्या सगळीकडे फिफा वर्ल्ड कपची जोरदार चर्चा सुरू आहे. याच फुटबॉलची क्रेझ  बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना व क्रिकेटर सचिन तेंडुलकरवरही आहे. आयुष्मानने नुकतीच बालदिनानिमित्त UNICEFने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. या कार्यक्रमातील फोटो आयुष्मान खुराना व सचिन तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युनिसेफने आयोजित कार्यक्रमात आयुष्मान खुराना व सचिन तेंडुलकरलाही फुटबॉल खेळण्याचा मोह आवरता आला नाही. लहान खेळाडूंबरोबर फुटबॉल खेळण्यात ते सहभागी झाले. त्यांचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर व आयुष्मान खुराना दोन वेगळ्या टीमकडून खेळत असून टीममधील खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा >> “मी लग्न करू की नको?” चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली, “करून टाका माझा…”

एकाने कमेंट करत “सचिन तेंडुलकर सरांचा फिटनेस उत्तम आहे. ५०व्या वर्षातही ते उत्तम फुटबॉल खेळत आहेत”,असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने आयुष्मान खुरानाला टॅग करत “तू तिथे काय करत आहेस?” असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा >> ‘पॉवर रेंजर’ फेम जेसन डेव्हिड फ्रॅंकचं निधन, ४९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सचिन तेंडुलकरनेही या कार्यक्रमातील काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या पोस्टला त्याने “लहान मुलांच्या भिन्नता व समानतेचा आज आम्ही सत्कार केला. सगळ्यांना समान संधी मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा”.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ayushmann khurrana plays football with sachin tendulkar fifa fever video goes viral kak