विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडित काढले. १९९० साली काश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली होती. चिन्मयने साकारलेल्या या भूमिकेसाठी त्याचा मोठा सन्मान करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात चिन्मयने फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका साकारली होती. या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला झी सिने पुरस्कार मिळाला आहे. झी सिने पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नकारात्मक पात्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याचा एक व्हिडीओ पोस्ट करत चिन्मयने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : “द कश्मीर फाइल्समध्ये काहीही खोटं दाखवलेलं नाही”; चिन्मय मांडलेकरने मांडले रोखठोक मत

“कृतज्ञता हा एकमेव शब्द आहे. द कश्मीर फाइल्स या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी झी सिने अॅवॉर्डने मला गौरवले आहे. नकारात्मक पात्रासाठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मला पुरस्कार देण्यात आला”, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

आणखी वाचा : ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात ‘बिट्टा’ साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला “हे फार चुकीचं…”

चिन्मयने हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात ज्येष्ठ अभिनेते गुलशन ग्रोव्हर, सनी देओल आणि अभिनेता बॉबी देओलच्या हस्ते चिन्मयला पुरस्कार दिला जात असल्याचे दिसत आहे. यावेळी चिन्मयने मराठीत सर्वांचे आभार मानत महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मनं जिंकली.

“खूप खूप धन्यवाद. द कश्मीर फाइल्सच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. तसेच झी सिने अॅवॉर्डचेही खूप खूप आभार. दोन मुलं, एक पत्नी आणि चार श्वान हे आज फार आनंदात असतील. माझा हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबासाठी समर्पित करतो. तुम्हा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद”, असे चिन्मय मांडलेकर यावेळी म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor chinmay mandlekar got zee cine award for the kashmir files movie bitta character see video nrp