अभिनेता चंकी पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याने एक पोस्ट शेअर करून आनंदाची बातमी दिली आहे. चंकी ६१ व्या वर्षी एक चाचणी उत्तीर्ण झाला आहे. याच चाचणीत तो ४३ वर्षांपूर्वी नापास झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. तुम्ही लायसन्सशिवाय रस्त्यावर गाडी चालवू शकत नाही. लायसन्स काढण्यासाठी वाहतूक विभागाकडून चाचणी घेतली जाते, ती चाचणी पास केल्यानंतरच लायसन्स मिळतं. चंकीला अखेर ६१ व्या वर्षी लायसन्स मिळालं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा – रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

“४३ वर्षांनंतर पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट दिली आणि मी पास झालो. धन्यवाद आरटीओ मुंबई”, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोत चंकीबरोबर एक अधिकारी दिसत आहे. चंकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करून त्याचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा – मुंबईत २० कोटींमध्ये घेतलेला बंगला कंगना रणौत यांनी ‘इतक्या’ कोटींना विकला, कोणी केला खरेदी? जाणून घ्या

चंकीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास तो २०२२ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. त्याने दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या स्पोर्ट्स ॲक्शन ‘लायगर’ सिनेमात भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. याशिवाय चंकीने काही जाहिरांतीमध्येही काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor chunky panday got his driving license at 61 hrc