सध्या सर्वांचंच लक्ष ‘आदिपुरुष’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाकडे लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या ट्रेलरमध्ये बॅकग्राउंडला ऐकू येणारं ‘जय श्रीराम’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं लॉन्च करण्यासाठी एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान अभिनेता देवदत्त नागे भावुक झालेला दिसला.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात मराठमोळा देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून देवदत्तच्या कामाचं सर्व जण कौतुक करत आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या ‘जय श्री राम’ गाण्याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. नुकताच या चित्रपटातील ‘जय श्रीराम’ गाण्याच्या लॉन्चचा सोहळा संपन्न झाला. हे गाणं ऐकताना देवदत्तने अश्रू रोखले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

या गाण्याच्या लॉन्चचा सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे. या सोहळ्यात अजय-अतुल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हे गाणं लाइव्ह गायलं. अजय-अतुल यांचं हे गाणं लाइव्ह ऐकताना देवदत्त भारावून गेला. हे गाणं ऐकल्यावर मनोगत व्यक्त करताना तो, “हे गाणं ऐकत असताना अनेकदा मी माझे अश्रू रोखून धरत होतो,” असं म्हणाला. संत मीराबाई, संत तुकाराम यांचा उल्लेख करत, “देवाशी जोडलं जाण्यासाठी संगीताची आवश्यकता आहे आणि संगीत हे आत्ता आपल्यासमोर बसलं आहे,” असं म्हणत त्याने अजय-अतुल यांचं कौतुक केलं. याचबरोबर हे गाणं आपल्या सर्वांना दिल्याबद्दल देवदत्तने त्यांचे आभारही मानले.

हेही वाचा : देवदत्त नागे खऱ्या आयुष्यात आहे ‘या’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा भाचा, जाणून घ्या त्यांच्या नात्याविषयी

‘आदिपुरुष’ हा चित्रपट २६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यात अभिनेता प्रभासने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader