बॉलिवूडमधील हिमॅन अशी ओळख असणारे अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. त्यांना धरम पाजी या नावानेच जास्त ओळखलं जातं. बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. नुकतंच बैसाखीच्या निमित्ताने धर्मेंद्र यांनी एक ट्वीट केले आहे. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटबद्दलही भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ते ‘लगता नहीं है जी मेरा’ हे दुःखी गाणे ऐकताना दिसत होते. हे ट्वीट शेअर करत त्यांनी मित्रांनो, आजची संध्याकाळ थोडी उदास आहे असे म्हटले होते. धर्मेंद्र यांच्या या ट्वीटनंतर त्यांचे चाहते काळजीत पडले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांना दु:खी असण्याचे कारण विचारले होते. त्यानंतर आता धर्मेंद्र यांनी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
धर्मेंद्र यांनी केलेल्या नव्या ट्वीटमध्येही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते एक कविता सांगताना दिसत आहे. यावेळी ते म्हणाले, “मिट्टी का बेटा हूं, मरते-मरते भी खुश कर जाऊंगा। उखड़ती-बूढ़ी सांसों से चुराके चंद सांसे मैं, चीरके सीना धरती का फसल नई एक बो दूंगा। खेतों में फिर हरियाली की चादर जब बिछ जाएगी। उग आएगी जवानी मेरी, सांसों में सांसें भी आ जाएंगी।
फिर होकर लथपथ मिट्टी में, मैं खेतों में भागूंगा। नाचूंगा, गाऊंगा और फिर पत्ते-पत्ते फसल सुनहरी जब हो जाएगी, लेकर दांती हाथों में, गाता गीत बैसाखी के, मैं सोने के ढेर लगा दूंगा, मैं सोने के ढेर लगा दूंगा। आज बैसाखी है। बैसाखी की बहुत बहुत शुभकामनाएं, बधाइयां। जीते रहो सारे, खुश रहो।” अशी कविता धर्मेंद्र यांनी ऐकवली आहे.
आणखी वाचा : Video : धर्मेंद्र यांची पहिली कार पाहिलीत का? १९६० साली इतक्या रुपयांना केली होती खरेदी
“माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे मित्रांनो. लगता नही हे जी मेरा, हे माझे आवडीचे गाणे आहे. त्यामुळेच मी ते तुमच्यासाठी पोस्ट केले होते. पण त्याव्यतिरिक्त मी खूप आनंदी आणि निरोगी आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम, असेच आनंदी राहा. तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद”, असे ट्वीट धर्मेंद्र यांनी केले आहे.
धर्मेंद्र हे लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहेत. त्याबरोबरच ते अपने २ या चित्रपटातही झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र हे ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेबसीरिजमध्ये दिसले होते.