हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे.

हिंदी मालिका, चित्रपपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सतीश कौशिकांबद्दल भावना व्यक्त केली आहे. तिने सतीश कौशिक यांचा फोटो शेअर करत तिने लिहले आहे, “हे अगदी अविश्वसनीय आहे. त्यांच्याबरोबर मी चार्जशीट, पॉप कौन या कलाकृतींमध्ये काम केलं आहे. त्यांच्याबरोबर काम करतानाचा काळ चांगला होता. सीनच्या दरम्यान त्यांच्याकडून किस्से ऐकायचे. ते नेहमीच सकारात्मक असायचे तसेच त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असायची. ते कायमच आपल्याला हसवायचे. खरंच विश्वास बसत नाही ते गेलेत. सतीशजी तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्ही कायमच आमच्या हृदयात राहाल. ओम शांती.” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सतीश कौशिक यांच्या ‘पप्पू पेजर’ या अजरामर पात्राचं कनेक्शन आहे ऋषी कपूर यांच्या सुपरहिट चित्रपटाशी; अभिनेत्यानेच केलेला खुलासा

दरम्यान सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक यांनी त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम केलं. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’ आणि ‘कागज’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

तर ‘मिस्टर इंडिया’, ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’, ‘परदेसी बाबू’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘हसीना मान जाएगी’, ‘राजा जी’, ‘आ अब लौट चलें’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader