दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलीवूडमधील अत्यंत लोकप्रिय कपल आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांची लव्ह स्टोरी ही चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात ती दोघं पहिल्यांदा एकत्र दिसली. आता अभिनेता गुलशन देवय्याने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या काही गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.
संजय लीला भन्साळी यांचा ‘राम-लीला’ हा चित्रपट हिट ठरला. याच चित्रपटाच्या सेटवर दीपिका आणि रणवीर भेटले आणि त्यांच्यातील प्रेम खुलत गेलं. या चित्रपटाच्या सेटवरील प्रत्येक जण त्यांच्या लव्हस्टोरीचा साक्षीदार आहे. आता या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता गुलशन देवय्याने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिकाला रणवीरच्या मांडीवर बसलेलं त्याने पाहिलं, असं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
आणखी वाचा : “मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज
गुलशन म्हणाला, “आम्ही या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं तेव्हा आम्ही काहीही पाहिलं नाही. त्यानंतर या चित्रपटाचं दुसरं शेड्यूल उदयपूरमध्ये होतं. तेव्हा मी पाहिलं, दीपिका ही रणवीरच्या मांडीवर बसली होती. आम्ही सर्वच आश्चर्यचकित झालो. हे कधी झालं! कारण त्याआधी आम्ही कधीच असं काही पाहिलं नव्हतं. त्या आधी आम्ही दोन-तीन गाणी शूट केली होती तेव्हा तर त्यांच्यात काहीही नव्हतं. आधी दीपिका सेटवर यायची, तिला दिलेले सीन करायची आणि निघून जायची.”
हेही वाचा : भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला झाले अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”
रणवीर आणि दीपिकाची जोडी सुपरहिट आहे. ‘राम-लीला’नंतर त्यांनी संजय लीला भन्साळी यांचेच ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ असे दोन चित्रपट एकत्र केले. दीपिका आणि रणवीरची जोडी असलेले हे तिन्ही चित्रपट तुफान गाजले. त्यामुळे आता आगामी काळात ही दोघं कधी एकत्र दिसणार याची चाहते वाट पाहात आहेत.