Gulshan Devaiah Dating Ex Wife: सुपरस्टार आमिर खान, दिग्दर्शक अनुराग कश्यपसह अनेक कलाकारांनी कामामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कसे परिणाम झाले हे सांगितलं आहे. आता गुलशन देवैयाने त्याच्या आयुष्यात कामामुळे आलेल्या चढ-उतारांबद्दल माहिती दिली. गुलशन त्याची पूर्वाश्रमीची पत्नी कॅलिरॉयला डेट करत आहे, त्याबद्दलही त्याने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलशनची पत्नी कॅलिरॉय ही ग्रीक नागरिक आहे. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं आणि २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नानंतरही ते चांगले मित्र होते, नंतर त्यांनी नात्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि आता ते एकत्र आहेत.

गुलशनने २०११ मधील ‘शैतान’ सिनेमातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २०२० पर्यंत तो फक्त सात चित्रपटात झळकला. याच दरम्यान त्याचं लग्न व घटस्फोट दोन्ही झाले. विवाहित असताना करिअरमध्ये आलेले चढ-उतार सांभाळणं खूप आव्हानात्मक होतं, असं गुलशनने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “मी पूर्णपणे तयार नव्हतो, मला अभिनयासह इंडस्ट्रीबद्दल बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या. मी भूमिका केलेला एखादा चित्रपट लोकांना आवडला नसेल तर त्याचे माझ्यावर भावनिक परिणाम होत होते. लोक माझ्या कामाचे कौतुक करायचे, पण चित्रपट चांगला व्यवसाय करायचे नाहीत, त्याचे माझ्यावर भावनिक परिणाम व्हायचे आणि मला ते परिणाम होण्यापासून थांबवण्यासाठी काही मार्ग शोधण्याची गरज होती,” असं गुलशन म्हणाला.

कोलकाता प्रकरणावर पोस्ट केल्यानंतर अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या; स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली, “कोणते संस्कार…”

या गोष्टींचा नंतर वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो, माझ्याही आयुष्यावर झाला. मी अशा क्षेत्रात काम करतोय, जे खूप अस्थिर आणि आपल्या अंदाजापलीकडचे आहे,असं गुलशन सांगतो. “आधीच खूप दबाव आणि निराशेचा सामना मी करत होते, मला वाटत होतं की या गोष्टी प्रोसेस करण्यासाठी मला जास्त वेळ हवा आहे. त्यामुळे मला इतर गोष्टींसाठी कमी मिळायचा. मी त्या सगळ्या व्यापात गुंतलो. पण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते, मलाही मोजावी लागली,” असं गुलशनने नमूद केलं.

“रितेश भाऊ जरा आवाज वाढवा…”, जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे भडकल्या सुरेखा कुडची, म्हणाल्या, “मांजरेकर असते तर…”

पुढे तो म्हणाला, “त्यानंतर माझ्याकडे मित्रांसाठी, कुटुंबासाठी पुरेसा वेळ नव्हता कारण मी माझी कला आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत होतो. तुम्ही स्थिर नोकरीत असाल तर तुम्हाला या गोष्टींचा जास्त विचार करण्याची गरज नाही. पण आमच्या बाबतीत पुढचे काम केव्हा मिळेल याची खात्री नसते आणि त्यावेळी अस्थिरता येते, ज्यासाठी खूप वेळ व ऊर्जा लागते.” कालांतराने त्याने चित्रपट चालतात की नाही याची काळजी करणं सोडून दिलं आणि त्याला बरं वाटू लागलं असं तो सांगतो.

कुठे आहे ‘मोहरा’तील ही अभिनेत्री? १८ वर्षांनी साध्वीच्या रुपात दिसली अन्…; आता करते ‘हे’ काम

आताचा गुलशन थोडा वेगळा आहे, कारण कॅलिरॉय सोबत आहे, असं त्याने म्हटलं. “हा नवीन मी आहे, सगळं चांगलं आहे. मी तिला गृहीत धरत नाही. आम्ही परत एकत्र आलो आहोत, पण याचा अर्थ ‘सर्व ठीक आहे’ असा नाही. करिअरमध्ये थोडा समतोल नक्कीच आहे, पण अजूनही स्थिर नाही. अस्थिरता अजूनही आहे आणि तो या व्यवसायाचा भाग आहे. मी वेळेनुसार बदलत गेलो नाही तर रिलेव्हंट राहणार नाही, हे सत्य स्वीकारावेच लागेल. मला आठवतं की २०११ हे माझं वर्ष होते, लोक मला खूप उत्साहाने भेटायचे, मग पुढच्या वर्षी आयुष्मान आला, आणि लोक त्याला भेटायचे, नंतर विकी कौशल आला! त्यामुळे कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी टिकत नाही,” असं गुलशन म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor gulshan devaiah talks about career marriage divorce reveals why he dating his ex wife hrc