बॉलीवूड अभिनेता इमरान खान बरीच वर्षे अभिनयापासून दूर आहे. पण नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत त्याच्या नवीन घराची झलक दाखवली. त्याने डोंगराळ भागात नवीन घर बांधलं आहे. हे घर स्वतः डिझाईन केलंय, अशी माहिती इमरानने दिली. मागच्या अनेक वर्षांपासून हे घर बांधत आहे, त्याची जागा निवडण्यापासून ते त्याच्या घराच्या रचनेवर आणि त्याच्या इंटीरियर डिझाइनवर त्याने मेहनत घेतली, असंही त्याने सांगितलं.

इमरान इतकी वर्षे इंडस्ट्रीपासून दूर आहे. त्यामुळे तो पैसे नेमके कुठून कमावत होता आणि त्याने हे घर बांधण्यासाठी पैसे कसे जमवले असे प्रश्न अनेकांना पडत आहेत. काहींनी इमरानच्या त्या पोस्टवर कमेंट्स करत पैशांबद्दल प्रश्न विचारले. जो अभिनेता वर्षानुवर्षे काम न करत नव्हता, त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले, असं एकाने विचारलं. तर ‘तुला पैसे कुठे मिळाले?’, ‘हा माणूस आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी अंडरग्राउंड होता,’ अशा प्रकारच्या कमेंट्स काहींनी केल्या होत्या.

‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर, पाहा Inside फोटो

पैशांसदर्भात असाच प्रश्न विचारणाऱ्या एका यूजरला इमरान खानने उत्तर दिलं. “मी २००० दशकाच्या मध्यात काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे,” असं इमरानने त्या ट्रोलरला उत्तर दिलं. ट्रोलिंग करणाऱ्या या युजरला इमरानने उत्तर दिल्यावर काही चाहते त्याचं कौतुक करत आहेत. इतकंच नाही तर अनेकांना इमरानचं हे निसर्गाच्या सानिध्यात बांधलेलं घर खूप आवडलं आहे. ते इमरानच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करत आहेत. तसेच हे घर पाहून त्यांना पडलेली प्रश्नही इमरानला विचारत आहेत.

मृणाल दुसानिसची लेक अमेरिकेत राहून शिकली फक्त ‘हा’ एकच शब्द; अभिनेत्री म्हणाली, “नवीन मराठी शब्द…”

इमरानने इन्स्टाग्रामवर १० फोटो शेअर करून त्याच्या घराबद्दल रविवारी माहिती दिली. “मागच्या काही वर्षांत मी जी कामं केली, त्यापैकी एक म्हणजे घर बांधणं होय. काही चित्रपटांमध्ये मी आर्किटेक्चरची भूमिका केली होती, पण खऱ्या आयुष्यात कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तज्ज्ञ असल्याचा दिखावा करू शकत नाही. पण मला गोष्टी शिकण्यात व करण्यात मजा वाटते,” असं इमरान म्हणाला.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

घर बांधण्याआधी या ठिकाणी वेगवेगळ्या ऋतुत वेगवेगळ्या वेळी भेटी दिल्या, असंही इमरानने सांगितलं. “मी वर्षातला पहिला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिला. पाऊस आल्यावर धबधबे पाहण्यासाठी व विविध ऋतूंमध्ये बदलणारी झाडांची पानं पाहण्यासाठी वेगवेगळ्या वेळी इथे आलो. माझ्या कॉन्ट्रॅक्टर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरशी बोलून मी काँक्रीट स्लॅबऐवजी आजूबाजूच्या गावांमध्ये घरं बांधण्यासाठी वापरलेल्या पारंपरिक पद्धतीचा वापर केला,” असं इमरानने कॅप्शनमध्ये सांगितलं.