बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच पर्यावरण प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लोक विनापरवानगी त्याचं नाव कामासाठी वापरतात, त्यामुळे नाराज असलेल्या जॅकी यांनी आता दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॅकी श्रॉफ यांचा मोठा चाहता वर्ग आहे. बऱ्याचदा लोक त्यांचं अनुकरण करतात. त्यांची भिडू म्हणण्याची स्टाइल तर खूपच लोकप्रिय आहे. इतकंच नाही तर त्याची बोलण्याची पद्धत, चालणं, हावभाव आणि आवाजाचं मॉड्युलेशनही इतर कलाकारांपेक्षा खूप वेगळं आहे. परवानगीशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वापर होत असल्याबद्दल जॅकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर याविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा – जान्हवी कपूरच्या काकूचं पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विधान; म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना…”

जॅकी श्रॉफ यांच्या याचिकेनुसार, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांचे नाव व भिडू शब्दाच्या वापराबाबत अधिकार हवे आहेत. त्यांनी १४ मे रोजी ही याचिका दाखल केली आहे. विना परवानगी त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि दोन कोटी १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.

हेही वाचा – “तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असला तरी…”, अनिल कपूरबद्दल भाऊ संजयचं विधान; म्हणाला, “अर्जुन, सोनम किंवा जान्हवी…”

उच्च न्यायालयाने सध्या जॅकी श्रॉफ यांच्या परवानगीशिवाय त्यांचं नाव, फोटो, आवाज व भिडू शब्द वापरणाऱ्यांविरुद्ध समन्स जारी केले आहेत. तसेच त्यांनी एमईआयटीवाय (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) यांना अभिनेत्याच्या वैयक्तिक अधिकारांचे होत असतील अशा सर्व लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. १५ मे रोजी न्यायालय या प्रकरणी पुढील निर्णय देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – “होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

जॅकी श्रॉफ यांचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, लोक त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो, आवाज, शब्द व नाव वापरून त्यांची प्रतिमा मलीन करत आहेत. अश्लील मीम्समध्ये त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. याशिवाय त्यांच्या आवाजाचाही गैरवापर होत आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन थांबविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यांची जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा आणि भिडू अशी वेगवेगळी नावं कोणत्याही व्यासपीठावर वापरण्यास बंदी घालण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor jackie shroff petition in delhi high court for personality rights protection hrc