ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र यांचं बालपण मुंबईत गेलं. ते खूप लहान असताना त्यांचे वडील मुंबईत आले होते. जितेंद्र १९ वर्षांचे होऊपर्यंत गिरगावातील एका चाळीत राहत होते. या चाळीतल्या आठवणी, शेजारी असलेले मराठी लोक, त्यांच्याकडून आयुष्य जगण्यासाठी मिळालेल्या शिकवणी, चाळ संस्कृती अशा अनेक गोष्टींबद्दल जितेंद्र यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
गिरगावातील खोली विकून कुलाब्यात फक्त ८ हजारांत घेतलेलं घर, जितेंद्र यांनी सांगितली आठवण; म्हणाले
गिरगावात मराठी लोकांमध्ये मोठे झाल्याचं जितेंद्र यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मराठी माणसाचं कौतुक केलं. “त्या काळी माझे शेजारी मोठ्या प्रमाणात मराठी होते. माझ्या काळातील मराठी लोकांबद्दल मी बोलत आहे. खूप चांगले लोक होते. त्या काळी लबाड शब्दही वाईट समजला जायचा, आजकाल आपण ऐकतो तेव्हा तो फार सामान्य वाटतो. पण त्याकाळी कोणी लबाड म्हटलं की वाईट वाटायचं. तेव्हाच्या मराठी लोकांमध्ये हावरटपणा नव्हता. जवळ जे काही होतं ते स्वतः मिळवल्याचा आनंद होता. मी आताही त्या लोकांना शोधत असतो. इतके चांगले मराठी लोक होते,” असं जितेंद्र ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले.
“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”
तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता सहज शक्य झाल्या आहेत, असं जितेंद्र यांनी नमूद केलं. “आता लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोट या गोष्टी सामान्य वाटतात. पण मी लहान असताना या गोष्टींचा विचारही करता येत नव्हता. घटस्फोट त्या काळी फक्त अमेरिकेत व्हायचे असं म्हटलं जातं. आताही मला मानसिकरित्या या गोष्टी स्वीकारणं कठीण जातं”, असं जितेंद्र म्हणाले.
ठमी गिरगावात शिकलो की स्वतःची पात्रता कधीच विसरायची नाही. स्वतःला खूप मोठं समजू लागलात तर ही तुमची चूक आहे. गिरगाव माझ्या मनात आहे, ते माझ्यापासून कधीच वेगळं होऊ शकत नाही,” असंही जितेंद्र यांनी नमूद केलं होतं.