पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. त्यांच्या भेटीगाठींपासून ते अमेरिकन सिनेटर्ससमोर त्यांनी दिलेलं भाषण, त्यांनी दिलेल्या भेटवस्तू या सर्व गोष्टी प्रचंड चर्चेत आहेत. अशातच पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन सिनेटर्ससमोरील भाषणातील एक क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील त्यांचं इंग्रजी ऐकून त्यांच्यावर टीका होत आहे. बॉलिवूड अभिनेता केआरकेनेही त्यांच्याबद्दल ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी मोदींचं नाव घेतलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मांजरेकर हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना का घेतात? ‘वास्तव’मध्ये संजय नार्वेकरला घेण्याचा किस्सा शेअर करत म्हणाले…

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मोदींनी काही शब्दांचा चुकीचा उच्चार केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ‘इन्व्हेस्ट’चा ‘इन्व्हेस्टिगेट’, ‘ऑप्टिकल फायबर’चा ‘पोलिटिकल फायबर’ किंवा ‘रिलेशनशिप’चा ‘रिलेशनसिपी’ असा उच्चार करण्यात आल्याचं ऐकू येत आहे.  या व्हिडीओच्या सत्यतेबाबत प्रशांत भूषण यांनी ट्वीटमध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही.

स्वतःची चेष्टा करून घेण्यात उपयोग नाही – केआरके

“कोणत्याही देशाचा पंतप्रधान इंग्रजी बोलण्याइतपत शिक्षित नसेल तर काही हरकत नाही. पण त्याने भयंकर इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्याच भाषेत बोलायला पाहिजे. टेलीप्रॉम्प्टर वापरल्यानंतर चुकीचे इंग्रजी बोलणं आणि स्वतःची चेष्टा करून घेण्यात उपयोग नाही,” असं केआरकेने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याचं हे ट्वीट पंतप्रधान मोदींच्या इंग्रजीमधील भाषणाच्या व्हायरल व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, केआरकेच्या या ट्वीटवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला सुनावलं आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल असं बोलणं योग्य नसल्याचं अनेक युजर्स म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor krk mocks at pm narendra modi english speech in america hrc
Show comments