ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला होता. आणि प्रदर्शित झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. देशभरात ठिकठिकाणी या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल केले जाऊ लागले. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर पाहायला मिळाला. प्रदर्शनानंतर तीन दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाची चौथ्या दिवसांपासून चांगलीच घसरण सुरू झाली. पहिल्या दिवशी ८६ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटानं १०व्या दिवशी फक्त ६ कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकारांविषयी आपल्याला माहित आहे. पण या चित्रपटात कुंभकर्णाची भूमिका कोणी केली होती? तसेच या भूमिकेसाठी ‘त्या’ अभिनेत्यानं काय मेहनत घेतली हे जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आदिपुरुष’मध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव लवी पजनी असं आहे. ६ फूट १० इंच इतका उंच असणाऱ्या अभिनेत्यानं कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. त्याने शरीराकडे अधिक लक्ष दिलं होतं. कुंभकर्ण साकारण्यासाठी लवीनं १४० किलो वजन वाढवलं होतं. तो दररोज २० पोळ्या, २५ अंडी आणि १ किलो चिकन खायचा. याची माहिती लवीनं स्वतः एका मुलाखतीमध्ये दिली.

हेही वाचा – Video: वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच सुम्बुल तौकीर खानचं सावत्र आईविषयी भाष्य; म्हणाली, “आता माझं….”

हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

लवी पजनी असा एकमेव अभिनेता आहे, जो ‘आदिपुरुष’मधील डायलॉगविषय उघडपणे बोलला. तो म्हणाला होता की, “चित्रपटातील डायलॉगबाबत मी नाराज व्यक्त करतो. कारण मी एक हिंदू आहे.” हनुमान पात्राच्या तोंडी हे वादग्रस्त डायलॉग होते, जे नंतर चित्रपटात बदलण्यात आले.

हेही वाचा – “त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली…..”; हेमा मालिनी यांनी सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

दरम्यान, लवी पजनी हा पटियालाचा राहणारा आहे. त्यानं ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पूर्वी ‘बाहुबली २’ मध्ये काम केलं होतं. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटातून लवीनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर २०२१मध्ये त्यानं ‘मोसागल्लू’ आणि ‘राधे’ चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor lavi pajni played kumbhakarna in adipurush who eat 20 rotis 25 eggs 1 kg chicken per day pps