आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना थिएटर रिलीजमध्ये मोठा फटका बसला. चित्रपटगृहात हा चित्रपट चांगली कमाई करु शकला नाही. परंतु आता ओटीटीवर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ठरलेल्या तारखेच्या आधीच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण ‘लाल सिंह चड्ढा’ला ओटीटीवर खूप प्रेम मिळाले. ट्विटरवरून अनेकजण या चित्रपटाचं भरभरून कौतुक केले. तसंच हा चित्रपटावर बहिष्कार घालून चुक केली अशीही मतं अनेकांनी व्यक्त केली. यावर अभिनेता मानव विज याने त्याची प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Atul Parchure
“जायच्या अगदी दोन महिन्यांआधी मला फोन करून …”, मिलिंद गवळींनी सांगितली अतुल परचुरेंची आठवण; म्हणाले, “फारच वाईट…”

आणखी वाचा : “त्याने माझ्यामागे कुत्रा…”; रणवीर सिंगने सांगितली प्रसिद्ध निर्मात्याबरोबरची धक्कादायक आठवण

अभिनेता मानव वीज यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आपल्या चित्रपटाला बॉयकॉट केल्यामुळे त्यालाही दुःख झालं. थिएटरमध्ये चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला पण आता ओटीटीवर चित्रपट बघून त्याचं कौतुक केल्यावर काय फायदा, तुमच्या मूर्खपणामुळे आज निर्मात्यांना तोटा सहन करावा लागत आहे, असं मत त्याने व्यक्त केलं आहे.

‘मिड-डे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं. थेटर मध्ये हा चित्रपट पाहायला हवा होता अशी हळहळ व्यक्त करणाऱ्या प्रेक्षकांवर त्याने निशाणा साधला. तो म्हणाला, “या चित्रपटाला चित्रपटगृहात बहिष्कार घातल्यामुळे ट्विटरवर अनेक जण या कृत्याबद्दल दुःख व्यक्त करत आहेत. तसेच हा चित्रपट थिएटरमध्ये न पाहिल्यामुळे ते आता माफी मागत आहेत. परंतु जर तुम्हाला खरंच याबाबतीचा पश्चाताप होत असेल तर तुम्ही आमिर खान प्रोडक्शनच्या अकाउंटला प्रत्येकी पाचशे रुपये पाठवा. तुमच्या मूर्खपणामुळे आज निर्मात्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.”

हेही वाचा : थिएटरमध्ये फ्लॉप पण ओटीटीवर हिट; ‘लाल सिंग चड्ढा’चे नाव सर्वोत्कृष्ट १० नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या यादीत सामील

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सुमारे १८० कोटी खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र आमिर खानच्या एका जुन्या वक्तव्यामुळे हा चित्रपट वादात सापडला. सोशल मीडियावर या चित्रपटावर प्रचंड बहिष्कार टाकण्यात आला होता. या चित्रपटाने थिएटरमध्ये जवळपास ७० कोटींची कमाई केली होती.

Story img Loader