अभिनेते मनोज बाजपेयी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज यांची आई गीता देवी आज (८ डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून गीता देवी आजारी होत्या. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्ली येथील मॅक्स पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मनोज यांच्या जवळच्या व्यक्तीने ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सांगितलं की, “मनोज यांच्या आईवर एक आठवड्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं.”
काही रिपोर्ट्सनुसार, मनोज यांच्या आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. मात्र बुधवारी (७ डिसेंबर) रात्री त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. मनोज त्यांच्या आईबरोबरच रुग्णालयामध्ये होते. पण रुग्णालयामध्येच गीता यांची प्राणज्योत माळवली.
आणखी वाचा – Video : “तू हात उचलायच्या लायकीचा…” अक्षय व प्रसादमध्ये हाणामारी, धक्काबुक्की केली अन्…
आई माझी ताकद, शक्ती व आधारस्तंभ आहे असं मनोज यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. गीता देवी यांच्या पश्चात तीन मुली व तीन मुलं असा परिवार आहे. गेल्या वर्षी २०२१च्या ऑक्टोबर महिन्यात मनोज यांच्या वडिलांचं निधन झालं.