बॉलीवूडचे हरहुन्नरी अभिनेते मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या आगामी ‘भैया जी’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोज यांच्या या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या मनोज बाजपेयी ‘भैया जी’ चित्रपटाच्या प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच एका मुलाखतीमध्ये मनोज यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला.

नुकतीच अभिनेता मनोज बाजपेयींनी सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखातीत मनोज यांनी तथ्य नसलेल्या बातम्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना विचारलं गेलं की, “तथ्य नसलेल्या बातम्यांमुळे सुशांत सिंह राजपूतला देखील खूप त्रास व्हायचा?” यावर मनोज बाजपेयी म्हणाले, “हो त्याला खूप जास्त त्रास होतं होता. याबाबतीत तो खूपच असुरक्षित होता. तो खूप चांगला माणूस होता. चांगल्या माणसावरच परिणाम होतं असतो. तो अनेकदा माझ्याकडे येऊन विचारायचा, सर मी काय करू? तर मी त्याला म्हणायचो की, तू जास्त मनावर घेऊ नकोस आणि चिंता करू नकोस. कारण मी अनुभवलं आहे, अजून अनुभवतो आहे.”

हेही वाचा – Video: “तुम्ही नैसर्गिक सौंदर्याची खरी व्याख्या…”, ऐश्वर्या नारकरांचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस

पुढे अभिनेते म्हणाले, “काही लोकं आहेत, ज्यांचे चित्रपट चालत आहेत, जे पॉवरमध्ये आहेत, त्यांना हाताळण अवघड आहे. पण मी वेगळ्या पद्धतीने हाताळत आहे. मी जेव्हा माझी पद्धत सुशांतला सांगितली तेव्हा तो खूप हसला होता. म्हणायचा, सर हे तुम्हीच करू शकता मी करू शकत नाही. मी कसं करू? तथ्य नसलेल्या बातम्यांमुळे त्याला खरंच भयंकर त्रास व्हायचा. तो खूपच संवेदनशील आणि हुशार माणूस होता. मी सेटवर जे मटण बनवायचो, त्याला ते खूप आवडायचं. मी केलेलं मटण खाण्यासाठी तो वेडा होता. कारण आम्ही बिहारी आहोत. त्याच्या निधनाच्या १० दिवसाआधी माझं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं होतं.”

हेही वाचा – Video: प्रथमेश परब आणि किशोरी शहाणेंचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरे व्वा…”

मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंह राजपूतने अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘सोनचिडिया’ चित्रपटात काम केलं होतं. दरम्यान, मनोज बाजपेयी यांचा आगामी ‘भैया जी’ चित्रपट हा १००वा चित्रपट आहे. हा चित्रपट २४ मेला प्रदर्शित होणार आहे. याविषयी मनोज बायजेयी म्हणाले, “मी कधी विचार केला नव्हता की, मी १०हून अधिक चित्रपट करेल. पण मी १००व्या चित्रपटाबरोबर इथे आहे. असं काही नाही की मी एकटाच खूप मेहनत करत आहे, सर्व कलाकार रोज मेहनत करत आहेत. मी या टप्प्यापर्यंत ईश्वर आणि प्रेक्षकांमुळे पोहोचलो आहे.”

Story img Loader