अभिनेते नाना पाटेकर यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. नाना पाटेकर यांनी मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान अमुल्य आहे. चित्रपटसृष्टीमधील उत्तम कामगिरीबाबत त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. नाना पाटेकर त्यांच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिले. ७२व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खासगी आयुष्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : मांडीवर बसून घट्ट मिठी मारली, किस केलं अन्…; बॉयफ्रेंडने प्रपोज करताच ‘कुछ कुछ होता है’मधली अंजली भारावली, व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकर यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. ‘खामोशी : द म्युझिकल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला. १९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नाना व मनिषा कोइराला यांनी वडील व मुलीची भूमिका साकारली होती.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर व मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटानंतर या दोघांनी ‘अग्नीसाक्षी’ हा चित्रपट एकत्र केला. ‘डिएनए हिंदी’च्या वृत्तानुसार या चित्रपटापर्यंत नाना पाटेकर व मनिषा यांच्या अफेअरच्या चर्चा बी-टाऊनमध्ये रंगू लागल्या. बऱ्याचदा नाना पाटेकर यांना मनीषाच्या घराबाहेरही पाहिलं गेलं. पण या चित्रपटानंतर मात्र दोघांच्या नात्याचा दि एण्ड झाला.

आणखी वाचा – रुग्णालयामध्ये जाऊन ऋषभ पंतच्या तब्येतीची केली विचारपूस, क्रिकेटरच्या भेटीनंतर अनुपम खेर यांचा सल्ला, म्हणाले, “कृपया…”

नाना पाटेकरांचं यावेळी लग्न झालं होतं. तरीही मनिषाबरोबर त्यांची अधिक जवळीक वाढली. मनिषा नाना पाटेकर यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव निर्माण करत होती. मात्र नाना पाटेकर आपल्या पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्यास तयार नव्हते. त्यानंतर मनिषा व नाना पाटेकर यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. नाना पाटेकर व मनिषा यांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी बऱ्याच रंगल्या.