ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाना पाटेकर सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. बॉलीवूडविषयी ते अनेकदा आपलं स्पष्ट मांडताना दिसतात. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकरांनी स्टारडमविषयी भाष्य केलं आहे.
नाना पाटेकर सांगतात, “आजकाल बॉलीवूडमध्ये रोज नवे कलाकार पदार्पण करत आहेत आणि त्यांच्या अभिनयाचं सुद्धा लोक तेवढंच कौतुक करतात. त्यामुळे सुपरस्टार होणं खूप कठीण झालंय. अलीकडच्या काळात बॉक्स ऑफिसच्या कमाईवरून एखाद्या अभिनेत्याचं स्टारडम ठरवलं जातं. पण, आधीच्या काळात असं नव्हतं…तेव्हाचे दिग्गज कलाकार आजही आपल्या लक्षात आहेत. दिलीप कुमार साहेब, राज कपूर, देव आनंद या दिग्गजांना आपण कधीही विसरू शकत नाही.”
नाना पाटेकर पुढे म्हणाले, “आजकाल दर आठवड्याला लोकांचे आवडते कलाकार बदलतात. आता स्टारडम बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरून मोजलं जातं. पण, ज्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी ओटीटी हे एक नवं व्यासपीठ तयार झालेलं आहे. ओटीटीवर अनेक कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे. तेव्हा आम्हाला अशी कामं मिळाली नाहीत. आता ओटीटीवर प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.”
दरम्यान, विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, रायमा सेन, पल्लवी जोशी, गिरीजा ओक गोडबोले, सप्तमी गौडा यांच्यासह अनेक कलाकार आहेत.