दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री मनीषा कोईरालाबरोबर ‘अग्नीसाक्षी’, ‘युग पुरुष’, ‘खामोशी’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नाना आणि मनीषा यांनी १९९६ मध्ये ‘अग्नी साक्षी’मध्ये एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषाचं विवेक मुशरनशी ब्रेकअप झालं होतं आणि ती नानांच्या प्रेमात पडली होती, असं म्हटलं जातं. त्यावेळी नाना विवाहित होते, पण ते पत्नी नीलकांतीपासून वेगळे राहत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चा खूप गाजल्या. मात्र या दोघांनी कधीच त्याबाबत भाष्य केलं नाही. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं, असं म्हटलं जातं. आता नाना पाटेकरांनी ‘द लल्लनटॉप’ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना करिअर, वैयक्तिक आयुष्य व इंडस्ट्रीतील काही कलाकारांबद्दल विचारण्यात आलं, त्याची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

मुलाखतीदरम्यान नाना पाटेकरांना १० नावं घेतल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे, ते विचारण्यात आलं. या नावांमध्ये शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, स्मिता पाटील, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्या नावांचा समावेश होता. त्यातच एक नाव मनीषा कोईरालाचं होतं. तिचं नाव घेतल्यावर नाना पाटेकर म्हणाले, “महान अभिनेत्री. तिला खूप कमी वयात कर्करोग झाला. तू ‘हीरामंडी’ पाहिलीस का? त्यात तिने खूप छान काम केलं आहे. मी सीरिज पाहिली.”

तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”

‘हीरामंडी’ पाहिल्यावर मनीषा कोईराला यांना शुभेच्छा दिल्या का? असं विचारल्यावर नाना म्हणाले, “नाही. कदाचित तिचा फोन नंबर आता तो नाही, बदलला आहे.”

नाना पाटेकरांच्या पत्नी बँकेत होत्या अधिकारी, लग्न केलं तेव्हा ‘इतका’ होता पगार; बायको ओरडते का? विचारल्यावर म्हणाले…

नाना पाटेकर व स्मिता पाटील यांची खूप चांगली मैत्री होती. स्मिता पाटील यांच्या निधनाबद्दल कळालं तेव्हा तुम्ही कुठे होता? असं विचारल्यावर नाना पाटेकर म्हणाले, “बाबा आमटेंसाठी शो सुरू होता, तिथेच मी होतो. मला गाडी तिच्यामुळेच शिकता आली. साडी घ्यायला सोबत न्यायची, कोणती साडी घ्यायचीय ते विचारायची. ती वेगळी होती, कमाल होती, खूप लवकर गेली. तिच्यासारखे लोक खूप कमी असतात. ती असती तर आताही इंडस्ट्रीत त्याच शिखरावर असती.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor nana patekar talks about manisha koirala rumored ex girlfriend heeramandi performance hrc