बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाच्याबरोबरीने ते आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. आता लवकरच त्यांची ‘ताज – डिवाइडेड बाय ब्लड’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्यांनी मुघलांबदद्ल वक्तव्य केलं असताना त्यांचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नसीरुद्दीन शाह चित्रपटसृष्टीत गेली अनेकवर्ष कार्यरत आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी बॉलिवूडवर टीका केली आहे. व्हिडीओमध्ये तो असे म्हणताना दिसत आहे की, हिंदी चित्रपटांमध्ये शीख, ख्रिश्चन, मुस्लिम यांची खिल्ली उडवली जाते. १०० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये हे घडत आहे.
सातत्याने फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन; म्हणाला…
नसीरुद्दीन शाह, त्यांची पत्नी रत्ना गेल्या वर्षी दिल्लीत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान ते असं म्हणाले, “हिंदी चित्रपटसृष्टीने कोणत्या समुदायाला सोडले नाही तुम्हीच सांगा, एकसारखेपणा करण्यात ते मास्टर आहेत. शिखांची चेष्टा केली गेली, पारशींची चेष्टा केली गेली, ख्रिश्चनांची चेष्टा केली गेली. मुस्लिम कायमच एक चांगला मित्र दाखवला जायचा जो शेवटी हिरोचा जीव वाचवताना आपले प्राण गमवायचा. पण मरणार हे नक्की.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
‘बिग बॉस’ फेम अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी केळकरने अखेर केला खुलासा; म्हणाली, “मी त्याची…”
नुकतेच त्यांनी मुघलांबद्दल वक्तव्य केले आहे होते. ते असं म्हणाले होते, ज्यांना माझ्या विचारांना विरोध करण्याची सवय आहे, त्यांना माझं म्हणणं कधीच समजणार नाही.” भारतात जे काही चुकीचं झालं ते मुघलांमुळे झालं, असं म्हटलं जातं. याकडे तुम्ही कसं पाहता, असं विचारलं असता शाह म्हणाले, “या गोष्टीचं मला खूप नवल वाटतं. खरं तर ते खूप हास्यास्पद आहे. म्हणजे, लोक अकबर आणि नादिर शाह किंवा बाबरचे पणजोबा तैमूर यांच्यातील फरक सांगू शकत नाहीत. खरं तर हे लोक इथे लुटायला आले होते, मुघल इथे लुटायला आले नव्हते. या देशाला ते आपलं घर बनवण्यासाठी इथे आले आणि त्यांनी तेच केले. त्यांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही” असंही ते म्हणाले.
नसीरुद्दीन शाह यांची ‘ताज – डिवाइडेड बाय ब्लड’ ही वेबसीरिज ३ मार्च २०२३ रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या वेबसीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता सुबोध भावे बिरबलाच्या भूमिकेत दिसणार आहे.