‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलियापासून वेगळा झाल्यानंतर त्यांच्या नात्यातील बऱ्याच गोष्टी उघडकीस आल्या. यामुळे नवाजुद्दिन चांगलाच चर्चेत होता. याबरोबरच ‘जोगीरा सा रा रा’ किंवा ‘टिकू वेड्स शेरू’ हे त्याचे चित्रपटही फारसे चालले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदी चित्रपटसृष्टीला स्वतःच्या अभिनयाची दखल घ्यायला लावणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराची जादू सध्या फिकी पडली असल्याचीही चर्चा होताना दिसत आहे. खुद्द नवाजुद्दिननेच यावार भाष्य केलं आहे. गेल्या काही महिन्यात केलेले प्रयोग फारसे यशस्वी झाले नसल्याने नवाजुद्दिन सध्या निवडक चित्रपटच स्वीकारत आहे. नुकतंच त्याने त्याच्या या अपयशाबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘गदर २’च्या यशानंतर सनी देओल घेणार ५० कोटी मानधन? अभिनेता खुलासा करत म्हणाला…

‘IANS’शी संवाद साधताना नवाजुद्दिन म्हणाला, “२०२४ मध्ये काय होईल हे मला ठाऊक नाही, पण नक्कीच यापुढे मी चित्रपटाचं स्क्रिप्ट काळजीपूर्वक निवडणार आहे. मी आता चित्रपट विचार करून करणार आहे कारण माझे काही प्रयोग फसल्याचं मला कळून चुकलं आहे. त्यामुळे मी आत्ता चांगलेच चित्रपट करण्यावर भर देणार आहे.”

आता लवकरच नवाजुद्दिनचा ‘हड्डी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील त्याचा ट्रान्सजेंडर लूकची चांगलाच व्हायरल झाला. नुकताचा या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात नवाजुद्दिनकडून चांगल्या चित्रपटांच्या अपेक्षा प्रेक्षकांना ठेवायला हरकत नाही असं चित्र समोर दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor nawazuddin siddiqui speaks about failure of his recent films avn