दिग्गज बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचे ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. बिहारमधील बेलसंड गावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित बनारस त्रिपाठी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. पंकज कुटुंबाबरोबर मुंबईहून गावी रवाना झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलांच्या निधनाची बातमी समजताच पंकज त्रिपाठी हे मुंबईहून गावाकडे रवाना झाले आहेत. पंकज रात्री ११ वाजेपर्यंत त्यांच्या गावी पोहोचतील. पंकज आणि त्यांचे वडील एकमेकांच्या खूप जवळ होते. अचानक वडिलांच्या निधनामुळे पंकज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंडित बनारस यांच्या पश्चात पत्नी हेमवंती त्रिपाठी आणि चार मुले असा परिवार आहे. पंकज यांचे वडील आणि आई त्यांच्या गावात साधे जीवन जगत होते. टीव्ही ९ हिंदीने याबद्दल वृत्त दिलं आहे.

चार वर्षे अफेअर, योगा टिचरशी लग्न अन्…, सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या भूमिका चावलाचा पती आहे तरी कोण?

पंकज त्रिपाठी यांचे आई-वडील मुळ गावी राहायचे. तर पंकज पत्नी व मुलीबरोबर मुंबईत राहतात. त्यांनी एका मुलाखतीत आपल्या वडिलांबद्दल माहिती दिली होती. त्यांच्या वडिलांना ते चित्रपटसृष्टीत काय काम करतात हे देखील माहीत नाही. ते त्यांचे सिनेमे पाहण्यासाठी कधीही थिएटरमध्ये गेले नाही. पंकज यांनी सांगितलं होतं की, त्यांचे वडील एकदा मुंबईत त्यांच्या पहिल्या घराच्या गृहप्रवेश समारंभासाठी आले होते, त्यानंतर ते अनेक वर्षे आले नाहीत.

पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं होतं की, जेव्हा कोणी वडिलांना टीव्हीवर चित्रपट दाखवायचे, तेव्हाच ते चित्रपट पाहायचे. चित्रपट पाहण्यासाठी ते कधीच सिनेमागृहात गेले नाहीत. पंकज यांनी नुकताच त्यांच्या गावी घरी आई-वडिलांसाठी टीव्ही लावला होता. अशातच आता त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली आहे. ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor pankaj tripathi father pandit banaras tripathi passed away hrc
Show comments