आज हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे पंकज त्रिपाठी आहेत. अनेकवर्ष संघर्ष करून ते बॉलिवूडमध्ये आज आघाडीचे अभिनेते बनले आहेत. आजवर त्यांनी वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ते आता अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये झळकणार आहेत. नुकतीच या संदर्भातील पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंकज त्रिपाठी सोशल मीडियावर फारसे सक्रीय नसतात. या बायोपिकविषयी त्यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की “खूप उत्साह थोडी भीती, मनामध्ये अनेक भाव मात्र निष्ठा पक्की, अटलजींच्या भूमिकेसाठी हे समर्पित, आता मी अटल आहे. अटलजींसारखे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणं कुठल्या ही परीक्षेपेक्षा कमी नाही, मात्र या परीक्षेत त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. आमच्यात आहे अटल विश्वास, #Main ATALHoon लवकरच,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव या बायोपिकचे दिग्दर्शन करत आहेत. पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.‘ द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित चित्रपटाची कथा असणार आहे. चित्रपटाच्याबाबतीत इतर माहिती लवकरच समोर येईल.