बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी यांचं शनिवारी (२० एप्रिल) झारखंडमधील धनबाद इथं एका अपघातात निधन झालं. पंकज यांची बहीण सबिता तिवारी व त्यांचे पती राकेश दोघेही कारने प्रवास करत असताना हा अपघात झाला. या अपघातात सबिता जखमी झाल्या, तर राकेश यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी दुपारी ४.३० वाजता दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-२ वरील निरसा बाजार इथं घडली. कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाला होता. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ पीटीआयने शेअर केला आहे.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन

व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, कार चालवत असलेले राकेश निरसा चौकात त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं, ज्यामुळे कार तीन फूट उंच दुभाजकावर चढली. हे दोघे बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून पश्चिम बंगालला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर दोघांना धनबादमधील शहीद निर्मल महतो वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आलं. पण राकेश यांना मृत घोषित करण्यात आलं. तर, सबिता यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात त्रिपाठी यांच्या कुटुंबासाठी हा दुसरा धक्का आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे २१ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले होते, त्यानंतर आता त्यांच्या भावोजीचं अपघाती निधन झालं आहे.

पंकज त्रिपाठी यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते शेवटचे नेटफ्लिक्सवरील चित्रपट ‘मर्डर मुबारक’मध्ये दिसले होते. सध्या ते ‘स्त्री २’ या कॉमेडी हॉरर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत.